मनोरंजन

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये मंदार जाधवचे साहसी सीन

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली असून यातील एका अवघड सीनसाठी अभिनेता मंदार जाधव याने साकारला आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय रंजक वळणावर आले असून लवकरच मालिकेत कबड्डीचा सामना रंगणार आहे.

शालिनीने शिर्केपाटील कुटूंबाची बळकावलेली प्रॉपर्टी मिळवायची तर तिच्यासोबतचा कबड्डीचा सामना जिंकावा लागेल अशी अट असल्यामुळे आता जयदीप-गौरी आणि संपूर्ण कुटूंबाने कंबर कसली आहे. कबड्डीचा सामना जिंकायचा तर चांगला प्रशिक्षक हवा.

याच प्रशिक्षकाचा शोध घेण्यासाठी जयदीप जंगलामध्ये गेला असताना भलत्याच संकटात सापडला. झाडाला लावलेल्या फासात त्याचा पाय अडकला आणि तो उलटा झाडाला लटकला.

अवघ्या काही मिनिटांच्या या सीनसाठी जयदीपची भूमिका साकारणाऱ्या मंदार जाधव याने बरीच मेहनत घेतली आहे. चार ते पाच तास या भागाचं शूटिंग सुरु होतं. हा सीन शूट करणं अवघड आणि तितकंच जबाबदारीचं होतं. फाईट मास्टर, दिग्दर्शकांच्या सुचना आणि सेटवरील सर्व मंडळींच्या सहकार्याने मंदारने हा अवघड सीन खूप मेहतीने पूर्ण केला.

चाहत्यांच्या मनोरंजनासाठी हे आव्हान स्वीकारले असल्याचे त्याने सांगितले. हा प्रसंग कायम लक्षात राहिल असंही तो पुढे म्हणाला.
'सुख म्हणजे काय असतं' मालिकेतला कबड्डीचा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता चाहत्यांची शिगेला पोहोचली आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : कोल्हापुरात घडतेय मेरी कोम : रिक्षाचालकाची मुलगी सानिका सासनेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT