बिग बॉसच्या घरात मालती चहरने वाइल्ड कार्ड एंट्री घेतली. आता मालतीच्या एकूणच खेळाचे कौतुकही होते आहे तर काही तिच्यावर टीकाही करत आहेत. मालती घरात आल्यापासून फक्त अमालशी भांडताना दिसत नाहीये. तिने अनेकदा अमालसाठी स्टँड घेतला आहेच. याशिवाय त्याचा स्वेटशर्टही अनेकदा घालताना दिसून आले. (Latest Entertainment News)
याशिवाय अमालला ती भेटली असल्याचे सांगितले. मालतीने याचा खुलासा करताना अमाल तिचा चांगला मित्र असल्याचे सांगितले आहे. अमालने आपल्या मित्रांना सांगितले की दोघे केवळ पाच मिनिटांसाठी भेटले होते. पण अलीकडच्या काही एपिसोडमध्ये मालतीने अमालला सगळ्यांना सत्य सांगण्याची धमकी दिली होती.
या शो चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मालती अमालला सांगते आहे की तो दोघांच्या मुलाखतीबाबत खोटे का बोलत आहे. मालतीने हे देखील सांगितले की ती अमालला भेटली आहे. त्यांनी त्यावेळी मालतीला चार गाणीही म्हणून दाखवली. अमाल त्यांच्या नात्याबाबत खोटे बोलत आहे. मालती म्हणते, ‘ भाई चार गाणे ऐकवले त्याने मला भेटल्यावर. 5 मिनिटे? बोलू का मी सगळे? माझ्या वडिलांनादेखील माहिती आहे की आम्ही कधी भेटलो, काय आहे, काय नाही. दोन मिनीटात मी हे सगळे क्लियर करू शकते. कॅमेऱ्यात खोटे बोलतो आहे. बावळट!
या प्रोमोचा व्हीडियो व्हायरल होतो आहे. हा पाहून यूजर म्हणत आहेत, ‘काहीतरी गडबड नक्कीच आहे.’ काय हे दोघे नात्यात होते?
अमाल आणि मालतीच्या नात्याचे सत्य तरी अजून समोर आले नसले तर चाहत्यांना मात्र काहीतरी वेगळे असल्याचा संशय आला असेल यात शंका नाही.