पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाची पन्नाशी गाठत आलेल्या मलायका अरोराला तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. सोशल मीडियावर तिने आपले काही फोटो पोस्ट केल्यानंतर तिला ट्रोलिंगला सामोरे जावं लागत आहे. कारण ठरले आहे तिचे कपडे. ब्ल्यू ब्रॅलेट आणि स्टायलिश पँट, श्रग असा पेहराव तिने केला आहे. या पेहराव्यावरून तिला नेटकऱ्यांनी वयाची आठवून करून दिलीय. स्वत:ची नव्हे तर वयाची लाज बाळग, अशी टीका करत नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले.
'मूविंग इन विथ मलायका' शोमधील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मलायका एका रेस्टॉरेंट वा पबमध्ये टेबलवर चढून डान्स मुव्ह्ज करताना दिसते. मलायका अरोराची ही स्टाईल पाहून काही नेटकऱ्यांनी कौतुक केले तर काही जण तिला ट्रोल करत आहेत.
मलायकाने शोदरम्यान सांगितलं की, ती तिची बहिण अमृता अरोराची मनधरणी करण्यासाठी गोवा जाते. शोमध्ये अमृता मलायकाला आव्हान देण्यासाठी अंदाजात म्हणते की, "चल तू आपल्या स्टाईलमध्ये चार्मचा जादू चालव आणि आम्हाला फ्री ड्रिंक्स मिळवून दे. मलायकादेखील आव्हान स्वीकारते आणि टेबलवर डान्स मुव्ह्ज करताना दिसते."
हेही वाचा :