टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं जय भानूशाली आणि माही विज यांचा १४ वर्षांचा संसार मोडल्याची चर्चा सध्या जोरात आहे. या पार्श्वभूमीवर माही विजने इंस्टाग्रामवर शेअर केलेली एक गूढ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
Mahhi Vij jay bhanushali divorce news
टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेता जय भानूशाली आणि अभिनेत्री माही विज यांचा तब्बल १५ वर्षांचा संसार मोडला आहे. माही विज - जय भानुशालीने २०१० मध्ये लग्न केले होते. त्यांनी ११ नोव्हेंबर २०११ रोजी आपले लग्न जाहीर केले होते. आता तब्बल १५ वर्षानंतर दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. जयची तारा, खुशी आणि राजवीर अशी तीन मुले आहेत. खुशी आणि राजवीरला त्यांनी दत्तक घेतले आहे.
दीर्घकाळापासून चर्चा होती की, जय -माहीमध्ये काहीतरी बिनसलं आहे. ४ जानेवारी रोजी दोघांनी इन्स्टाग्रामवर जाहीर केले की, दोघे घटस्फोट घेत आहेत. आता घटस्फोटानंतर माही विजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर काही नोट शेअर केले आहेत.
माही विजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मेसेज शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने थेट कोणाचंही नाव न घेता मेसेज लिहिलं आहे. ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांना ती जय भानूशालीसोबतच्या नात्याबद्दल अप्रत्यक्षपणे भाष्य करत असल्याचं वाटत आहे. पोस्ट व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
"लोक सुंदर आत्मे, दयाळू हृदये आणि चांगल्या उर्जेवर विश्वास ठेवतात याचे कारण बना. चांगली व्यक्ती बनणे कधीही थांबवू नका."
माहीने शेअर केलेली दुसरी नोट अशी आहे:
"तुम्ही त्यांच्याशी जे वागता तेच लोक तुमच्याशीही करतील असे तुम्हाला वाटत असेल तर शेवटी तुम्ही खूप निराश व्हाल."
जेव्हा हा मेसेज व्हायरल झाला आणि लोकांनी ते जयसाठीच असल्याचे म्हटले, तेव्हा माहीने दुसऱ्या स्टोरीत जयसोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले: "हे आम्ही आहोत, या नोट्स जयसाठी नव्हत्या."
घटस्फोटाची घोषणा करताना माही आणि जय यांनी लिहिले:
''आज, आम्ही आयुष्यात वेगवेगळ्या मार्गांनी चालण्याचा निर्णय घेत आहोत, परंतु आम्ही नेहमीच एकमेकांना पाठिंबा देऊ. शांती, प्रगती, चांगुलपणा आणि मानवता ही नेहमीच आमची प्राथमिकता राहिली आहे.आमच्या मुलांना - तारा, खुशी आणि राजवीर - आम्ही चांगले पालक होण्याचे, चांगले मित्र राहण्याचे आणि त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते करण्याचे वचन देतो.
आम्ही वेगवेगळ्या मार्गांवर असू शकतो, परंतु या निर्णयात कोणताही दोष किंवा नकारात्मकता नाही. तुम्ही कोणतेही गृहीत धरण्यापूर्वी, कृपया समजून घ्या की आम्ही नाटकापेक्षा शांतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाची शांती निवडली आहे.
आम्ही एकमेकांचा आदर आणि पाठिंबा देत राहू आणि नेहमीप्रमाणेच मित्र राहू. पुढे जाताना आम्हाला तुमचा आदर, प्रेम आणि समजूतदारपणा हवा आहे.''