Mahavatar Narsimha-spiderman-saiyaara Box Office Collection
मुंबई - सैयारा, कुली, वॉर २ असे एकापेक्षा एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. दरम्यान, ॲनिमेटेड चित्रपट 'महावतार नरसिंह'ने देखील कमाईच्या बाबतीत सर्वांना मागे टाकलं आहे. २६ व्या दिवशीही महावतार नरसिंहने शानदार कमाई केलीय तर 'मुफासा: द लायन किंग' आणि 'स्पायडरमॅन' चे आकडे किती जाणून घेऊया. दुसरीकडे सैयाराची काय परिस्थिती आहे, पाहुया.
महावतार नरसिंहने मंगळवारी २६ व्या दिवशी २.५ कोटींची कमाई केली आहे. हिंदीमध्ये १.९ कोटी, तेलुगूमध्ये ४५ लाख कमावले आहेत. बॉक्स ऑफिस एकूण २१५.३५ कोटी कमावले आहेत. वर्ल्डवाईड चित्रपटाने एकूण २७९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर परदेशात २३ कोटींची कमाई केली आहे.
हा चित्रपट मागील वर्षी २०२४ ला रिलीज झालेला 'मुफासा : द लायन किंग'च्या तुलनेत पुढे आहे. 'मुफासा'ने २६ व्या दिवशी केवळ ७५ लाखांची कमाई केली होती. तर हिंदीमध्ये ३५ लाखांचे कलेक्शन होतं. ॲनिमेटेड चित्रपट स्पायडर मॅन ॲक्रॉस द स्पायडर व्हर्स (Spider-Man: Across the Spider-Verse) ने २६ व्या दिवशी केवळ २६ लाख कमाई केली होती आणि हिंदीमध्ये केवळ ६ लाखांचा कलेक्शन केलं होतं.
सैयारा कमाईत आता घट होत आहे. मंगळवारी चित्रपटाने ३५ लाख रुपयांची कमाई केली. आतापर्यंत चित्रपटाने ३२५.१५ कोटींची कमाई भारतात केलीय तर वर्ल्डवाईड हा आकडा ५४७.८५ कोटी आहे.