Maa-Behen Netflix Success Pudhari
मनोरंजन

New OTT Film: 2 तासाच्या चित्रपटाने नेटफ्लिक्सवर घातला धुमाकूळ; प्रदर्शित होताच पोहोचला पहिल्या क्रमांकावर, काय आहे नाव?

Maa-Behen Netflix Success: माधुरी दीक्षितचा 'माँ-बहन' हा कॉमेडी-थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच नंबर 1 स्थानावर पोहोचला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maa-Behen Netflix Success: ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला नवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात, तर काहींना लोकप्रियता मिळण्यासाठी वेळ लागतो. मात्र, अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नव्या 'माँ-बहन' या कॉमेडी-थ्रिलर चित्रपटाने नेटफ्लिक्सवर येताच मोठी झेप घेतली आहे.

या चित्रपटाने रिलीजच्या काही दिवसांतच नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, दक्षिण भारतीय सुपरस्टार धनुषच्या 'कारा' या चर्चित चित्रपटालाही मागे टाकत 'माँ-बहन'ने नंबर 1 चे स्थान मिळवले आहे.

'कारा' दुसऱ्या क्रमांकावर घसरला

30 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'कारा' हा चित्रपट 28 मे रोजी नेटफ्लिक्सवर आला होता. ओटीटीवर आल्यानंतर या चित्रपटाने चांगली लोकप्रियता मिळवत नंबर 1 स्थान मिळवले होते. मात्र आता 'माँ-बहन'च्या जोरदार एंट्रीनंतर 'कारा' दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

याशिवाय Meg 2: The Trench तिसऱ्या, Godzilla x Kong: The New Empire चौथ्या स्थानावर आहे. तर सैफ अली खानचा 'कर्तव्य' हा चित्रपट टॉप 10 यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

'माँ-बहन'मध्ये माधुरी दीक्षितची वेगळी भूमिका

'माँ-बहन' या चित्रपटात माधुरी दीक्षित दोन मुलींच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या पात्राचे नाव रेखा आहे. तर तिच्या दोन मुलींच्या भूमिकेत अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर धारणा दुर्गा झळकल्या आहेत.

चित्रपटात अभिनेता रवी किशनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तो माधुरीच्या शेजाऱ्याची भूमिका साकारताना दिसतो. चित्रपटाचा एकूण कालावधी 127 मिनिटांचा म्हणजेच सुमारे 2 तास 7 मिनिटांचा आहे.

नेमकी कथा काय?

दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरते. रेखा आणि तिच्या दोन्ही मुलींच्या आयुष्यात सतत काही ना काही गोंधळ सुरू असतो. मात्र त्यांच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा त्यांच्या शेजाऱ्याचा मृतदेह त्यांच्या घरात आढळतो.

यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे कथा अधिक रहस्यमय आणि रंजक बनते. विनोद, रहस्य आणि थरार यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर 'माँ-बहन'ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट सध्या ओटीटीवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT