मनोरंजन

घराणेशाही-सत्तानाट्याचा खेळ रंगणार, ‘ओ भाऊ ओ दादा ..’ नवं गाणं भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लोकशाही' हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. घराणेशाहीतल्या या सत्तासंघर्षात नेमके काय आव्हान असणार आहे आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहे, हे गुपित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत संजय अमर दिग्दर्शित 'लोकशाही' चित्रपटातील 'ओ भाऊ ओ दादा..', हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला ५ फेब्रुवारीला आलं आहे.

संबंधित बातम्या –

महत्त्वाचं म्हणजे, प्रसिद्ध गायक जयदीप बगवाडकर यांनी आजवर मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी संगीत क्षेत्रातील नामांकित दिग्गज, गायिका श्रेया घोषाल, वैशाली सामंत, बेला शेंडे तसेच गायक अवधूत गुप्ते यांच्यासोबत अनेक रिअॅलिटी शोज केले आहेत.

जयदीप बगवाडकर यांचे सूर लाभलेल्या या गाण्याचे बोल संजय अमर यांचे असून या गाण्यामधून अभिनेता अंकित मोहन चा डॅशिंग लूक दिसत आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे, समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अभिनेता अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत लोकशाही सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. इतकेच नव्हे तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

SCROLL FOR NEXT