Yami Gautam Pregnant : गुडन्यूज! यामी गौतम होणार आई?; ३ वर्षानंतर आदित्यच्या घरी येणार नवा पाहूणा | पुढारी

Yami Gautam Pregnant : गुडन्यूज! यामी गौतम होणार आई?; ३ वर्षानंतर आदित्यच्या घरी येणार नवा पाहूणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमीने नुकतेच गुडन्यूज दिली आहे. यामी आणि चित्रपट निर्माता आदित्य धर लवकरच आई-वडील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( Yami Gautam Pregnant )

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री यामी गौतमी साडे पाच महिन्यांची प्रेंग्नट ( Yami Gautam Pregnant ) असून पुढच्या मे महिन्यात तिची डिलिव्हरी होणार आहे. म्हणजे, मे महिन्यात यामी एका गोडस बाळाला जन्म देणार आहे. या आनंदाच्या बातमीने अभिनेत्री यामीचे संपूर्ण कुटुंबिय खूप उत्साहित आहेत. मात्र, यामीने याबाबतची अद्याप अधिकृत्त माहिती शेअर केलेली नाही.

यामीने २०२१ मध्ये ‘उरी’ दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी लग्न केल आहे. लग्नाच्या ३ वर्षानंतर दोघांनी ही गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर ही गुडन्यूज मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

वर्क्रफंन्टबद्दल बोलायचे झाल्यास, यामी आगामी ‘आर्टिकल ३७०’ चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आज ८ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रियमणी, इरावती हर्षे, किरण यांच्यासह अनेक कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. हा तचित्रपट २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

Back to top button