Singer-composer Leslee Lewis new song instagram
मनोरंजन

Singer-composer Leslee Lewis | लेस्ली लुईस यांची तब्बल २६ वर्षांनंतर वापसी! नव्या गाण्याची धूम

Singer-composer Leslee Lewis | लेस्ली लुईस यांची तब्बल २६ वर्षांनंतर वापसी! नव्या गाण्याची धूम

स्वालिया न. शिकलगार

इंडी-पॉपला नवी ओळख देणारे गायक-संगीतकार लेस्ली लुईस यांनी २६ वर्षांनंतर नव्या गाण्याद्वारे हिंदी संगीत क्षेत्रात पुनरागमन केले आहे. त्यांच्या या कमबॅकने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. ९० च्या दशकातील त्यांच्या लोकप्रियतेनंतर आता पुन्हा एकदा ते नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर आले आहेत.

लेस्ली लुईस २६ वर्षांनंतर पुन्हा वापसी करत आहे. हिंदी चित्रपटातील पार्श्वगायनमध्ये वापसी करत 'जोर का धक्का' गाणे घेऊन येत आहे. "वापसी करणं रोमांचक आहे, संपूर्ण गाणे खूप उत्तम असल्याचे लेस्ली लुईस म्हणाले.

लेस्ली म्हणाले, “२००० मध्ये मी हरिहरन सोबत मि‍ळून चित्रपट 'मेला' साठी देखो २००० ज़माना आ गया गाणे कम्पोज केले आणि गायले होते. कदाचित एकमेव असे गाणे आहे, जे मिलेनियम गाणे आहे. आता, तब्बल २६ वर्षांनंतर, मी आपले जुने मित्र राजू सिंहसाठी 'जोर' साठी गात आहे. हे एक टायटल ट्रॅक आहे, ज्याचे नाव 'जोर का धक्का' आहे. गाण्यात आणखी काही गायकांचे सूर आहेत. कारण की, यात चित्रपटाचे डायलॉग आणि मोंटाजदेखील आहेत. पण मी मुख्य गायक आहे.”

लेस्ली यांचे वडील, महान कोरियोग्राफर पी.एल. राज यांनी एकदा आपल्या मुलाला म्हटलं होतं की, 'जर त्याने चित्रपटांशी संबंधित संगीत तयार केलं नाही तर, तो कधीच मोठं नाव कमावू शकणार नाही. आता पुन्हा वापसी करत असताना ते म्हणाले- ''हिंदी चित्रपटांमध्ये वापसी करणं खूप रोमांचक आहे. सर्वात आधी तर मला राजू सिंहचे संगीत खूप पसंत आहे. कारण ते एक महान संगीतकार आहे. एक व्यक्ती म्हणून ते खूपच शानदार आहेत. जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वी आम्ही अनेक संगीतकारांसोबत गिटार वाजवत होतो. मला खूप आनंद आहे की, त्यांनी मला या टायटल ट्रॅकसाठी आठवणीत ठेवलं. त्यांनी ज्याप्रकारे विभिन्न आवाजे दिली आहेत, ते कमालीचे आहेत. दीर्घकाळ नंतर हिंदी सिनेमामध्ये गाणे गाऊन मी खूप खुश आहे.''

मागील महिन्यात त्यांचे चॅनेल "लेस्ली लुईस ऑफिशियल"वर नवे गाणे रिलीज झाले आहे. त्याचे चाळीस हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. रॉक, पॉप, रीमिक्स, क्लब, फ्युजन अशा स्वतंत्र संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे जवळपास प्रत्येक क्षेत्रात यश मिळवलं आहे.प्रादेशिक चित्रपटांमध्ये त्यांनी २००५ मध्ये हॅरीस जयराज दिग्दर्शित तमिळचे सर्वात हिट गाण्यांपैकी एक 'कन्नुम कन्नुम नोकिया' गायलं आहे. त्यांनी तमिळ चित्रपट 'मोधी विलायडु' आणि 'चिक्कू बुक्कू'साठीही संगीत दिलं आहे.

लेस्ली लुईस यांच्या विषयी थोडेसे...
लेस्ली लुईस हे भारतीय संगीतविश्वातील एक प्रसिद्ध संगीतकार, गायक आणि निर्माता आहेत. १९९० च्या दशकात इंडी-पॉपला लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांची ओळख विशेषतः Colonial Cousins या संगीत जोडीमुळे निर्माण झाली. लेस्ली लुईस यांचा जन्म ३ एप्रिल, १९५८ रोजी मुंबई येथे झाला. त्यांनी आपल्या संगीत प्रवासाची सुरुवात जाहिरातींसाठी जिंगल्स तयार करून केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT