क्यों की सास भी..च्या दुसऱ्या सीझनचे काऊंटडाउन आता सुरू झाले आहे. टेलिव्हीजन विश्वात नवा अध्याय सुरू करणारी मालिका म्हणून क्यो की सास भी कभी बहू थी कडे पहिले जाते. आता या सिरियलचा दूसरा सीझन येऊ घातला आहे. पहिल्या सीझनमध्ये अनेकांच्या घराचा आणि मनाचा ठाव घेणारी ही मालिका आता नव्या रूपात समोर येते आहे.
राजकारणानंतर अभिनेत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सिरियलचा प्रीमियर 29 जुलैला होणार आहे.
अभिनेता रोहित सुचांती या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील. अंगद विरानी हे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असेल. तर त्याच्या जोडीला या मालिकेत शगुन शर्मा दिसणार आहे. परी विरानी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. तर ऋतिक विरानी या व्यक्तिरेखेत अमन गांधी दिसतो आहे. तर वृंदा पटेलच्या व्यक्तिरेखेत तनिषा मेहता दिसणार आहे.
स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय यांच्यासहित नव्या सीझनमध्ये जुने कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यामध्ये हितेन तेजवानी, गौरी प्रधान, शक्ति आनंद, केतकी दवे, कमलिका ठाकूरता, प्राची सिंह हे कलाकार दिसणार आहेत. तर बरखा बिष्ट अमर उपाध्यायच्या प्रेमिकेच्या व्यक्तिरेखेत दिसू शकत असल्याचे बोलले जात आहे.
या मालिकेत स्मृती इराणीला प्रत्येक एपिसोडसाठी 14 लाख मानधन मिळणार असल्याचे बोलले जात आहे तर मिहिर विरानीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अमर उपाध्यायला पर एपिसोड 1.5 लाख मिळणार आहेत.
हितेन तेजवानीला 1 ते 1.5 लाख रुपये मानधन मिळणार आहे
गौरी प्रधान आणि शक्ति आनंदला 80 हजार ते 1.5 लाख प्रत्येक एपिसोडला मिळणार आहे.
केतकी दवे आणि कमलिका ठाकूरताला 50 हजार ते 1 लाख रुपये मानधन पर एपिसोड मिळू शकते.