क्यू की सास भी कभी बहू थी या अत्यंत लोकप्रिय सिरियलचा दूसरा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेतून अभिनेत्री स्मृती इराणीसह पहिल्या सीझनमधील अनेक कलाकार पुन्हा दिसण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घेऊया कधी या सिरियलच्या प्रीमियरबद्दल अधिक..(Latest Entertainment News)
कधी आहे प्रीमियर?
ही सिरियल प्रेक्षकांना ओटीटी आणि टीव्हीवर पाहता येईल. आज म्हणजेच 29 जुलैला ही सिरियल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
किती वाजता दिसणार?
रात्री 10.30 वाजता ही सिरियल ऑन एअर दिसणार आहे.
कुठे पाहता येणार?
ही सिरियल टेलिव्हिजनचे प्रेक्षक स्टार प्लस या मालिकेवर आणि ऑनलाइन मालिका पाहणारे प्रेक्षक जिओ हॉटस्टारवर पाहू शकतील.
या मालिकेची नोंद सर्वात जास्त काळ चालणारी मालिका म्हणूनही झाली आहे. 3 जुलै 2000 पासून ते 6 नोव्हेंबर 2008 पर्यंत ही मालिका सुरू होती. या मालिकेचे जवळपास 1833 एपिसोड प्रसारित झाले आहेत.
या मालिकेत अभिनेत्री स्मृति इराणी आणि अमर उपाध्याय हे मुख्य भूमिकेत दिसतील. तर याशिवाय हितेन तेजवानी, गौरी प्रधान, शक्ति आनंद, केतकी दवे, कमलिका ठाकूरता, प्राची सिंह आणि बरखा बिष्ट हे कलाकार दिसणार आहेत.
तर नव्या कलाकारांच्या यादीत अभिनेता रोहित सुचांती या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसतील. अंगद विरानी हे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असेल. तर त्याच्या जोडीला या मालिकेत शगुन शर्मा दिसणार आहे. परी विरानी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. तर ऋतिक विरानी या व्यक्तिरेखेत अमन गांधी दिसतो आहे. तर वृंदा पटेलच्या व्यक्तिरेखेत तनिषा मेहता दिसणार आहे.
या सिरियलच्या पहिल्या सीझनचा एपिसोड 6 नोव्हेंबर 2008 मध्ये आला होता. या एपिसोडमध्ये अंबा वीरानी म्हणजेच बा यांचे निधन होते. त्यानंतर त्यांच्या मृत्यूपत्राने कथेत एक नवीन वळण आले होते.
या मृत्यूपत्राचा गोंधळ सुरू असतानाच तुलसीला एक धमकीचे पत्र मिळते ज्यात लिहले असते की तुलसीने तिची सगळी संपत्ती हरवलेला नातू पार्थच्या नावे करावी.
तुलसी पार्थच्या नावे संपत्ती करून त्याचा शोध घेण्यास निघते त्यावेळी तिला समजते की तिची जीवलग मैत्रीण पार्वती अगरवाल हिनेच तिच्या नातवाला किडनॅप केले होते. आता 17 वर्षानंतर यात कोणता बदल होईल हे पाजणे रंजक ठरेल.