कुंग फू पांडा -४ सीरीज १५ जुलैला ओटीटीवर रिलीज झाली आहे Instagram
मनोरंजन

Kung Fu Panda 4 | कुंग फू पांडा -४ ला पसंती; दमदार चित्रपट पाहायला विसरु नका

कुंग फू पांडा -४ ला प्रेक्षकांची पसंती

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कुंग फू पांडा ४ नावाची कहाणी पो नावाच्या एका पात्राभोवती फिरते. हा चित्रपट १५ जुलै रोजी रिलीज झाली आहे. जिओ सिनेमा प्रिमिअरवर बहुप्रतीक्षित कॉमेडी-अॅडव्हेंचर, Kung Fu Panda 4 चे प्रीमियर झाले. इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मराठी आणि बंगाली अशा सात पेक्षा अधिक भाषांमध्ये हे उपलब्ध आहे. ड्रॅगन वॉरियर आपल्या पसंतीच्या भाषेत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला आहे.

माईक मिशेल दिग्दर्शित आणि स्टेफनी मा स्टाईन द्वारा सह-दिग्दर्शित हा ॲनिमेटेड फिचर ओटीटीवर पाहायला मिळत आहे. जॅक ब्लॅक पो उर्फ ड्रॅगन वॉरियरच्या रुपात परतला आहे. अभिनेता इयान मॅकशेन, डस्टिन हॉफमॅन, जेम्स होंग आणि ब्रायन क्रँस्टन देखील कलाकार आहेत. नवे कलाकार अक्वाफिना, के हुई क्वान, रोनी चियेंग, लोरी टॅन चिन आणि वियोला डेविस देखील आहेत. कुंग फू पांडा फ्रेंचाईजचा चौथा फिचर आहे.

या बहुप्रतीक्षित पो (जॅक ब्लॅक द्वारा आवाज) आपल्या आतापर्यंतच्या सर्वात कठीण आव्हानाला सामोरे जातो. त्याचा उत्तराधिकारी शोध एक अनपेक्षित वळण घेतो, जेव्हा एक धूर्त रूप बदलणारा खलनायक, द कॅमॅलियन (वियोला डेविस द्वारा आवाज) उद्भवतो, जो त्यांच्या जगाचा समतोल बिघडवण्याची धमकी देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT