Kon Honar Crorepati new season announced  
मनोरंजन

Kon Honar Crorepati | प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली; 'कोण होणार करोडपती' लवकरच भेटीला

Kon Honar Crorepati new season | प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली; 'कोण होणार करोडपती' लवकरच भेटीला

पुढारी वृत्तसेवा

ज्ञानाला नवी दिशा देणारा 'कोण होणार करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सोनी मराठी वाहिनीने कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचा अधिकृत लोगो अनावरण करत "लवकरच" अशी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर कार्यक्रमाची चर्चा सुरू झाली आहे.

'कोण होणार करोडपती' हा केवळ प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम नाही, तर सामान्य माणसाच्या ज्ञानाला योग्य व्यासपीठ मिळवून देणारा आणि आयुष्य बदलण्याची संधी देणारा शो आहे. गेल्या अनेक पर्वांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील स्पर्धकांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठी रक्कम जिंकत स्वतःची स्वप्ने पूर्ण केली आहेत.

वाहिनीने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या नव्या लोगोमध्ये कार्यक्रम भव्य असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्ञानाचा प्रवास पुन्हा आता प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

(video-sonymarathi Instagram वरून साभार)

आता शोचे सूत्रसंचालन कोण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कार्यक्रम नेमका कधी प्रसारित होणार, याबाबत अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.

ज्ञान, आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची संधी देणारा हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT