मनोरंजन

Mukesh Rishi : बॉलीवूडचा खतरनाक विलेन साकारणार अफजल खान

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी यांची गणना बॉलिवूडमधील खतरनाक खलनायकांमध्ये केली जाते. मुकेश यांनी आपल्या नकारात्मक भूमिकांनी प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आहे. मात्र काही काळापासून ते काही काळ बॉलिवूडपासून दूर राहिले. अलीकडच्या काळात ते पंजाबी, तेलगू, कन्नड आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करताना दिसले. अशा स्थितीत आता ते एका मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा मराठी चित्रपट शेर शिवराजमध्ये ते महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

२०१२ मध्ये आलेल्या 'खिलाडी ७८६' या चित्रपटात मुकेश यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आशिष आर. मोहन दिग्दर्शित या चित्रपटात मुकेश यांनी अक्षय कुमार, असिन आणि हिमेश रेशमियासोबत काम केले होते.

मुकेश यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी न्यूझीलंडमध्ये राहून मॉडेलिंगला सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये अभिनय करण्याचे स्वप्न घेऊन ते न्यूझीलंडहून भारतात आले. मुकेश यांनी वयाची साठी पार केली आहे. सध्या ते ६५ वर्षांचे आहेत. मुकेशचा फिटनेस पाहून त्यांचे वय इतके असेल, हे पाहून कुणालाही विश्वास नाही बसणार.

त्यांचा 'मेरा नाम है बुल्ला, रहता हूँ खुल्ला' हा डायलॉग खूप गाजला. मुकेश यांनी साकारलेली 'रंगा राव' ही व्यक्तिरेखाही खूप गाजली. त्यांनी इंडियन, जुडवा आणि घातक चित्रपटात साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांना आठवते.

मुकेश यांनी टीव्हीवरही काम केले आहे. टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'पृथ्वी वल्लभ' या शोमध्ये त्यांनी काम केलं होतं.

मराठी चित्रपटात दिसणार

मुकेश ऋषी अफजल खानाची भूमिका साकारणार आहेत. 'शेर शिवराज' चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार? याची उत्सुकता गेले अनेक दिवस साऱ्यांनाच लागली होती. आता त्या रहस्याभोवतीचा पडदा उठला आहे. त्याच्या उंच उंचीमुळे पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारण्यातही मुकेशला खूप मदत झाली आहे.

शेर शिवराजमधील भूमिकेविषयी बोलताना मुकेश ऋषी म्हणाले होते-'छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभी राहणारी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच ज्याच्या ध्यासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा कल्पक आणि अभ्यासू दिग्दर्शकासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाल्याचं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.

SCROLL FOR NEXT