Kim Kardashian -Kanye West 
मनोरंजन

Kim Kardashian-Kanye West : किम कार्दशियन पुन्हा झाली सिंगल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लोबल सुपरस्टार किम कार्दशियनने तिचा पती आणि रॅपर कान्ये वेस्टसोबतचं (Kim Kardashian-Kanye West) नातं अधिकृतपणे संपवलं आहे. लग्नाच्या ८ वर्षानंतर किम कार्दशियन आणि कान्ये वेस्टनी घटस्फोट घेतलाय. रिअॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियनला (Kim Kardashian-Kanye West) कायदेशीररित्या अविवाहित घोषित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर तिच्या नावापुढील वेस्ट हा शब्द काढण्याची परवानगीही मिळाली आहे. आता किमचं मॅरिटल स्टेटस सिंगल आहे. म्हणजच कान्ये वेस्टचं नाव किम आपल्या नावाच्या पुढे हटवू शकते.

सध्या किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांचे घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे. किम कार्दशियनने गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये पती कान्ये वेस्टपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी किम आणि कान्येचे चाहते याबद्दल खूप दुःखी झाले होते. किम कार्दशियन कोर्टाच्या सुनावणीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर झाली.

रिपोर्टरच्या म्हणण्यानुसार, लॉस एंजेलिस सुपीरियर कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश स्टीव्हन कोच यांनी किमला "कायदेशीररित्या सिंगल" घोषित केले.

Kim Kardashian -Kanye West

किमने मॅरिटल स्टेटस सिंगल करण्याची केली विनंती

किम -कान्ये वेस्ट हे खूप दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. गेल्या वर्षी केनिया वेस्टने त्याचे नाव बदलून "ye" केले. या संदर्भात वेस्टने न्यायालयात कागदपत्रेही सादर केली. किम कार्दशियनने तिची मॅरिटल स्टेटस सिंगल करण्याची कोर्टात विनंती केली होती. डिसेंबर २०२१ मध्ये, किमने कोर्टात तिचे मॅरिटल स्टेटस सिंगल करण्याची लेखी परवानगी मागितली. मात्र, वेस्टने यावर आक्षेप घेतला. त्याला हे आवडले नव्हते की किम विवाहित न मानता, स्वतःला अविवाहित मानतेय.

वेस्टच्या आक्षेपावर किमने फेब्रुवारी २०२२ रोजी न्यायालयात कागदपत्रे सादर केली. त्यामध्ये त्याने म्हटले होते की, कान्ये वेस्टने कायदेशीररित्या त्याचे नाव बदलले आहे. तेव्हापासून त्याने घटस्फोट प्रकरणात नवीन अटी जोडण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी सुपीरियर न्यायालयाने सुनावणी केली आणि किमला सिंगल स्टेटस दिला. व्हर्च्युअल सुनावणी दरम्यान, किम कार्दशियनने तिच्या नावातून वेस्ट आडनाव वगळले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT