कियारा सध्या आई बनण्याची फेज एंजॉय करत असली तरी तिच्याकडे येणारे प्रोजेक्ट्स अजिबात कमी होताना दिसत नाहीत. डिलिव्हरीनंतर कियाराच्या कमबॅकसाठी अनेक प्रोजेक्ट दृष्टीपथात आहेत. पण सध्या अशी चर्चा आहे की कियारा मीनाकुमारीच्या बायोपिकमधून कमबॅक करू शकते. या रोलसाठी सगळ्यात आधी कृती सेनॉनचे नाव चर्चेत होते. पण अचानक कियारा हा सिनेमा साईन करण्याच्या खूप जवळ असल्याचे बोलले जात आहे.
कियाराला ही स्क्रिप्ट आवडली आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कियाराला लुक आणि अभिनय या दोन्हीमुळे या रोलसाठी अॅप्रोच केले गेले होते. तिला सिनेमाची पटकथाही आवडली होती. अर्थात यासंबंधी कोणताही ऑफिशियल साईन इन झाले नाही तरी हा सिनेमा कियाराच्या खात्यावर जमा असल्याचे बोलले जात आहे.
बॉलीवूडची Tragedy Queen असा किताब मिरवणारी मीना कुमारी तिच्या अभिनय आणि उत्तम शायरीसाठी ओळखली जाते. मीना कुमारी तिला बॉलीवुडने दिलेले नाव आहे. मीना कुमारीचे मूळ नाव महजबीन बानो असे आहे. बरेच सिनेमे हे भावनिक व्यक्तिरेखेवर आधारलेले होते. ‘बैजूबावरा’, ‘परिणीता’, ‘साहिब बीवी और गुलाम’, ‘काजल’ आणि ‘पाकीजा’ हे मीनकुमारीचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत.
कियारा सध्या war 2 मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती सुपरस्टार यशसोबत टॉक्सिकसोबत दिसणार आहे