

फुलेराच्या निवडणुकीचे धुमशान आता सुरू झाले आहे. कारण पंचायतचा सीझन 4 उद्या रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. उद्या म्हणजेच 24 जूनला रात्री 12 वाजता हा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिरीजमध्ये आता मंजू देवी आणि क्रांति देवी यांच्या निवडणुकीसाठी सुरू असलेला संघर्ष आकार घेतो आहे तर दुसरीकडे सचिव आणि रिंकीच्या नात्याला वेगळे वळण मिळते आहे.
पंचायत: पंचायत सिरिजची सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे त्याचा साधेपणा. त्यातले प्रत्येक व्यक्तिरेखा ही आपल्याला आपलीशी वाटते.
त्यांचे स्वभाव, गुण, दोष या सगळ्या बाबतीत ती तुमच्या आमच्यापैकीच वाटतात. पण यापेक्षाही जवळचा वाटतो तो गावाकडच्या मातीशी जोडलेली नाळ. पंचायतप्रमाणेच अशा काही सिरिज आहेत ज्या तुम्हाला गावाकडच्या आठवणीत घेऊन जातील. तुम्हाला माहिती आहे का कोणकोणत्या आहेत त्या सिरिज..
ग्राम चिकित्सालय : खेडेगावातील ग्राम चिकित्सालय आणि त्याभोवती फिरणाऱ्या सोईसुविधा यावर बेतली आहे. याशिवाय ही गोष्ट आहे अशा एका डॉक्टरची जो दिल्लीतील प्रथितयश दवाखाना सोडून झारखंडमधील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी येते. या सिरिजमध्ये अमोल पाराशर, विनय पाठक, आनंदेश्वर द्विवेदी हे कलाकार आहेत. गावाकडच्या लोकांची आरोग्य सोईविषयीची जागरूकता वाढवण्यासाठी या सिरिजचा हीरो मेहनत घेताना दिसतो. विशेष म्हणजे ही सिरिज पंचायतच्या मेकर्सनी बनवली आहे. त्यामुळे त्याच्यात पंचायत टच सापडला तर आश्चर्य वाटू नये
दुपहिया : काल्पनिक गाव आणि त्याच्या गमती जमती यावर बेतलेली सिरिज म्हणजे दुपहिया. या सिरिजच्या दुसऱ्या सीझनची नुकतीच घोषणा झाली. या सिरिजमध्ये गजराज राव आणि रेणुका शहाणे भुवन अरोड़ा, स्पर्श श्रीवास्तव, शिवानी रघुवंशी आणि यशपाल शर्मा हे कलाकार आहेत.