‘KGF: Chapter 2’ चे सह-दिग्दर्शक कीर्तन नडगौडा यांच्या कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं असून, त्यांच्या लहान मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
KGF 2 Co-Director Kirtan Nadagouda 4 year old Son passed away
ब्लॉकबस्टर केजीएफ आणि 'सलार' चित्रपटाचे सह-दिग्दर्शक कीर्तन नादगौडा यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. कीर्तन यांचा ४ वर्षांचा मुलगा सोनार्श नादगौडाचा १७ डिसेंबर रोजी लिफ्टमध्ये अडकला होता, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री, अभिनेते पवन कल्याण यांनी शोक व्यक्त केला असून त्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रिपोर्टनुसार, नादगौडा कुटुंबीयांमध्ये सोनार्श हा प्रेमळ आणि उत्साही मुलगा असं म्हटलं आहे.
अभिनेते पवन कल्याण यांनी लिहिले की, "दिग्दर्शक कीर्तन नादगौडा यांच्या मुलाचे निधन झाले. हे अत्यंत हृदयद्रावक आहे. कीर्तन यांनी तेलुगू आणि कन्नड दिग्दर्शनात त्यांनी पदार्पण केले होते. त्यांच्या कुटुंबावर आलेल्या दुःखद घटनेने मी खूप दुःखी आहे. कीर्तन आणि श्रीमती समृद्धी पटेल यांचे पुत्र सोनार्शचं निधन झालं."
लिफ्टमध्ये काय घडलं? मीडिया रिपोर्टनुसार, ही दुर्देवी घटना हैदराबादमध्ये सोमवारी, १५ डिसेंबर रोजी घडली. सोनार्श खेळता खेळता एकटाच लिफ्टमध्ये गेला. यावेळी लिफ्टमध्ये अडकल्यामुळं त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं होतं. सोनार्शला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी यत्न केले. पण, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना खूपच भयावह होती.
कीर्तन नादगौडा यांच्याविषयी...
कीर्तन नादगौडा यांनी अन्य भाषेतील चित्रपटांसाठीही काम केलं आहे. ते चित्रपट निर्माते आणि सहाय्यक दिग्दर्शक आहेत. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसाठी काम केलं आहे. प्रशांत नीलसोबतचे त्यांचे काम सर्वश्रुत आहे. केजीएफच्या दोन्ही भागांसाठी आणि सालारसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं होतं.