File Photo
मनोरंजन

कॅटरिना कैफच्या प्रेग्नेंसीवर विकी कौशलचा खुलासा

स्वालिया न. शिकलगार

विक्की कौशलने आगामी चित्रपट बॅड न्यूजच्या ट्रेलर लॉन्चवेळी कॅटरीना कैफच्या प्रेग्नेंसी अफवांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. विक्कीचे म्हणणे आहे की, जेव्हा गुड न्यूज टाईम येईल, तेव्हा सांगण्यास कोणतीही लाज बाळगणार नाही.

काही दिवसांपूर्वी कॅटरीनाचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता. ज्यामध्ये लोकांनी तिचे बेबी बंप दिसत असल्याचा दावा केला होता. आता या सर्व गोष्टी अफवा ठरल्या आहेत. विक्की कौशलने पत्नी कॅटरीना कैफच्या प्रेग्नेंसी बातम्यांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

विक्की कौशलच्या बॅड न्यूज चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवर कॅटरीना कैफला प्रेग्नेंसीशी संबंधित प्रश्न विचारण्यात आळा. तेव्हा त्याने खूप मजेशीर स्टाईलमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना विक्कीला विचारण्यात आले की, तू कधी 'गुडन्यूज' शेअर करणार आहेस. यावर विक्कीने उत्तर दिलं- जेव्हा वेळ येईल, सर्वात आधी मीडियाला सांगेन. पण आता 'बॅड न्यूज' एन्जॉय करा. जेव्हा 'गुडन्यूज का टाईम' येईल, ते शेअर करण्यास लाज बाळगणार नाही.

video - viral bhayani Instagram अकाऊंटवरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT