Karuppu Box Office collection 
मनोरंजन

Trisha-Suriya Karuppu BO | एकीकडे थलपतीचा 'विजय' तर दुसरीकडे त्रिशा कृष्णन, सूर्यासोबत मिळून मिळवले तब्बल इतके कोटी; 'कंगुवा'ला पछाडलं

Karuppu BO | एकीकडे थलपतीचा 'विजय' तर दुसरीकडे त्रिशा कृष्णन, सूर्यासोबत मिळून मिळवले तब्बल इतके कोटी; बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई

स्वालिया न. शिकलगार

Karuppu Box Office collection India and world wide

थलपती विजयने अभिनयाला रामराम केल्यानंतर प्रचंड चर्चा झाली. त्याचवेळी अभिनेत्री त्रिशा कृष्णनचीही जोरदार चर्चा होऊ लागलीय. दरम्यान, आणखी एका गोष्टीसाठी त्रिशा चर्चेत आली ते म्हणजे तिचा करुप्पु हा चित्रपट. या चित्रपटात लोकप्रिय साऊथ अभिनेता सूर्यासोबत त्रिशा कृष्णन मुख्य भूमिकेत झळकलीय. हा चित्रपट इतका यशस्वी ठरत आहे की, कमाई बाबतीत अवघ्या पाच दिवसात करुप्पुने कंगुवा या चित्रपटाला पछाडले आहे.

सूर्या- त्रिशा कृष्णन यांचा ‘करुप्पु’ चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई करणाऱ्या चित्रपटाने बॉलीवूड अनेक नव्या चित्रपटांना मागं टाकलं आहे.

‘करुप्पु’ची पाचव्या दिवशीची कमाई किती?

या चित्रपटात सूर्या करुप्पूसामीच्या भूमिकेत आहे. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताहेत. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हे सिद्ध केलं होतं की, चित्रपट अजिबात बोरिंग नाही. यामुळे बॉक्स ऑफिस तिकिट खिडकीवर कमाईचा वर्षाव होतोय.

वीकेंडचा फायदा

वीकेंडमध्ये दमदार परफॉर्म केल्यानंतर कमाईचे आकडे समोर आले आहेत. पहिल्या सोमवारी शानदार कमाई तर मंगळवारी थोडी घसरण झालेली पाहायला मिळाली. तरी देखील तिकिट बारीवर यश सुरुच आहे.

चित्रपटाचे कलेक्शन पाचव्या दिवशी-१२.७५ कोटी रुपये

पहिल्या सोमवारी - १४.३० कोटी रुपये

ओपनिंग डे - १५.५० कोटी रुपये

शनिवार (विकेंड) - २४.१५ कोटी रुपये

रविवार (विकेंड) - २८.३५ कोटी रुपये

ग्रॉस कलेक्शन ११०.०४ कोटी रुपये तर नेट कलेक्शन ९५.०५ कोटी रुपये.

वर्ल्डवाईड कलेक्शन?

ओवरसीज कलेक्शन पाचव्या दिवशी परदेशात ४ कोटी, एकूण कमाई ५१ कोटी झालीय. वर्ल्डवाईड पाच दिवसांचे एकऊम कलेक्शन १६१.०४ कोटी रुपये झाले आहे. ‘करुप्पु’ तेलुगु डब व्हर्जनने पाटच दिवसांत ९.६२ कोटी कमावले. 'एथार्कम थुनिन्धवन' (२०२२) ने भारतात ४९.१० कोटींचे नेट कलेक्शन केलं होतं. 'कंगुवा'ने ७०.३७ कोटी रुपये आणि 'रेट्रो'ने भारतात नेट कलेक्शनमध्ये ६०.५८ कोटी कमावले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT