Sunjay Kapur Family Dispute
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचं वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. संजय कपूरसोबतच्या तिच्या लग्नानंतर अनेकदा दोघांच्या नात्यातील तणाव, वादानंतर गॉसिप्स बाहेर आल्या. आता पुन्हा एकदा करिश्माच्या संसाराबाबत धक्कादायक दावा समोर आला आहे. संजय कपूरच्या बहिणीने अलीकडेच केलेल्या खुलाशात म्हटलं आहे की, प्रिया सचदेव ही करिश्मा-संजयच्या संसारभंगामागचं मोठं कारण ठरली. त्यांच्या मते, प्रियामुळे करिश्माच्या आयुष्यात वादळ आलं आणि शेवटी तिचं घर उद्ध्वस्त झालं. या दाव्यामुळे पुन्हा एकदा कपूर फॅमिलीतील जुने वाद चर्चेत आले आहेत.
करिश्मा कपूरने २००३ मध्ये दिल्लीतील उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं होतं. सुरुवातीला सगळं सुरळीत दिसत असलं तरी काही वर्षांतच त्यांच्या संसारात वाद निर्माण झाले. करिश्माने नंतर संजयविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. अखेर हे लग्न घटस्फोटाने संपुष्टात आलं. दरम्यान, संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा वाद समोर आला आहे. एकीकडे, संजय यांची आई तर दुसरीकडे पत्नी आणि करिश्मा कपूरच्या मुलांना मिळणारा संपत्तीतील वाटा...यामुळे वाद विकोपाला गेला आहे. कपूर फॅमिलीत तर्क-वितर्क होऊ लागले आहेत.
दरम्यान, संजय कपूरची बहिण आणि करिश्मा कपूरची नणंद मंदिरा कपूरने मोठा खुलासा केला आहे. तिने दावा केला आहे की, करिश्मा - संजय यांचं नातं तुटण्यामागे संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेवचा हात होता. मंदिराने करिश्माची बाजू घेत आपल्या भावासोबतच्या नात्यावर देखील बातचीत केली.
मंदिरा कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, करिश्माला आधीच समजलं होतं की, संजय आणि प्रिया यांच्यात जवळीकता वाढत आहे. त्यावेळी करिश्मा - संजयला दोन मुले होती. संजय आपल्या मुलांबाबत खूप भावूक होता. पण, प्रिया आल्यानंतर सर्वकाही बदललं. एखाद्याच्या संसारत मिठाचा खडा टाकणे चुकीचे आहे. एक महिला जिने आता-आता आपल्या मुलाला जन्म दिला, तिचे आयुष्य बिघजवणे, लग्न तोडणे, अगदी चुकीचे आहे. करिश्मा याची हकदार नव्हती.'
मंदिराने सांगितले की, तिच्या वडिलांनी संजय-प्रियाच्य नात्याला कधी मंजुरी दिली नव्हती. वडील स्पष्ट म्हणायचे की, हे नाते चुकीचे आहे आणि नाते पुढे जाऊ नये. मंदिरा आणि तिची बहिण संजय-प्रियाच्या (२०१७) लग्नात देखील गेल्या नाहीत.
मंदिरा - करिश्मा कपूर चागंल्या मैत्रीणी होत्या. पण जेव्हा संजय कपूरशी करिश्माचे नाते संपुष्टात आले, तेव्हा मंदिराला तिला पाठिंबा देता आला नाही, त्यामुळे आजपर्यंत त्या गोष्टीचा खेद असल्याचे मंदिराने नमूद केले.