Kapil Sharma return in tv show  Instagram
मनोरंजन

Kapil Sharma | ११ वर्षांनंतर टीव्हीवर परततोय कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा

Kapil Sharma | ११ वर्षांनंतर टीव्हीवर परततोय कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा

स्वालिया न. शिकलगार

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा ११ वर्षांनंतर पुन्हा टेलिव्हिजनवर परतत आहे. नव्या फॉर्मॅटचा कॉमेडी शो घेऊन तो छोट्या पडद्यावर एन्ट्री करणार असून, प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Kapil Sharma return in tv show after 11 years

मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा ११ वर्षानंतर कलर्स टीव्हीवर वापसी करत असल्याचे वृत्त आहे. त्याने प्रसिद्धी इतूनच मिळवली होती. आता तो लाफ्टर शेफ ३ मध्ये दिसणार आहे. त्याचा आगामी चित्रपट किस किसको प्यार करूं २ चे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या दरम्यान कपिल विषयी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, तू-तू मै मै नंतर कपिल शर्मा पुन्हा चॅनलवर परततोय. त्याची सुरुवात या चॅनेलवरून झाली होती. आता प्रदीर्घ काळानंतर तो छोट्या पडद्यावर येतोय.

कपिल शर्मा गेल्या काही वर्षांत OTT प्लॅटफॉर्मवर, स्टँडअप टूरमध्ये ॲक्टिव्ह होता. ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्यानंतर तो नव्या स्वरूपात परत येणार आहे. माहितीवरून कळते की, कपिल शर्मा लाफ्टर शेफमधून परत येतोय. या शोमध्ये फक्त हास्य विनोदच नव्हे, तर यावेळी तो ऑडियन्स इंटरअ‍ॅक्शन, खास सेलिब्रिटी गेस्ट एपिसोड्स, तसेच नवीन फॉर्मॅट घेऊन येणार असल्याची माहिती मिळतेय.

कपिलच्या टीममधील काही जुन्या कलाकारांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे, तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळणार असल्याचं समजते. शोमध्ये पुन्हा एकदा कृष्णा अभिषेक, भारती सिंह सोबत कॉमेडी करताना दिसतील. हे त्रिकुट पुन्हा प्रेक्षकांना खिळवून ठेवायला तयार आहे. आपल्या जबरदस्त केमिस्ट्री सोबत अनेक वर्षानंतर स्क्रीनवर पुन्हा एकत्र दिसतील.

कपिलचा नवा अंदाज

कपिल शर्मा या शोमध्ये खाना बनवण्याचा अंदाज नवा असणार आहे. कुकिंग चॅलेंज सोबत तो मज्जा मस्ती करताना दिसणार आहे. तू तू मै मै नंतर कॉमेडी नाईट्स विथ कपिल शो अचानक संपुष्टात आला होता. आता ११ वर्षांनंतर तो त्याला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत. दरम्यान, कपिल शर्माचा चित्रपट किस किसको प्यार करूं १ हा १२ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात त्रिधा चौधरी, आयशा खान, हीरा वरीना, पारूल गुलाटी मुख्य भूमिकेत आहे. दिवंगत अभिनेते असरानी देखील दिसणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT