Kantara Chapter 1 box office Collection
मुंबई - 'कांतारा चैप्टर १' चे वादळ बॉक्स ऑफिसवर अद्यापही आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी कांतारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा ‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपट जगभरात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करत ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत नाही, तर हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्येही रिलीज झाला.
कांतारा हा चित्रपट एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि थरारक कथानक सादर करतो. ऋषभ शेट्टीने या चित्रपटात दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका दोन्ही पार पाडल्या आहेत. चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने धमाल उडवून दिली. रविवारी, 'कांतारा चॅप्टर १' ने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. अनेक टिकाणी रविवारचे कलेक्शन, गुरुवारच्या ओपनिंग कलेक्शन पेक्षा उत्तम राहिले आहेत. हिंदीमध्ये रविवारी अन्य मोठ्य चित्रपटांपेक्षा दमदार कमाई झाली. चित्रपटाने वर्ल्डवाईड देखील लँडमार्क पार केलं आहे.
चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने शनिवारपर्यंत बॉक्स ऑफिसवर ५२ कोटींचे कलेक्शन केले होते. पहिल्या दिवशी १८.५ कोटी शानदार ओपनिंग ठरणारा 'कांतारा चॅप्टर १' चे हिंदी व्हर्जनने, शुक्रवारी कासव गती पकडली. त्यावेळी केवळ १३.५ कोटी कमावले. पण, विकेंडचा पुरेपूर फायदा चित्रपटाला झाला. हे कलेक्शन २० कोटींपर्यंत गेले.
रिपोर्ट्सनुसार, 'कांतारा चॅप्टर १' ने चौथ्या दिवशी २३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हिंदी व्हर्जनमध्ये चित्रपटाचे ओपनिंग विकेंड कलेक्शन ७५ कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचले. अजय देवगनच्या 'रेड २', अक्षय कुमारचा 'स्कायफोर्स' आणि आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सारख्या बड्या चित्रपटांचे फर्स्ट वीकेंड कलेक्शन ७५ कोटींपेक्षा कमी ठरले. 'कांतारा चॅप्टर १' ला एक फायदा गुरुवारच्या रिलीजचा मिळाला.