‘दीया और बाती हम’ फेम अभिनेत्री कनिका माहेश्वरीने इंडस्ट्रीला अलविदा करून भक्तीमार्ग स्वीकारला आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितलं की आता ती अध्यात्म आणि ध्यानात शांतता शोधत आहे. कनिका सध्या उत्तराखंडमध्ये साधनेत रमली असून लवकरच आपल्या अध्यात्मिक प्रवासावर पुस्तक लिहिणार आहे.
Kanika Maheshwari leave tv industry
मुंबई - लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि दीया और बाती हम फेम कनिका माहेश्वरीने अचानक इंडस्ट्रीला अलविदा केलं आहे. अनेक हिट मालिका आणि शोमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या कनिकाने आता भक्तीमार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना आणि सहकलाकारांनाही धक्का बसला आहे.
कनिका माहेश्वरी ही टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. दीया और बाती हम, कहानी घर घर की, राजा की आएगी बारात यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांनी ती घराघरात पोहोचली होती. मात्र आता अभिनेत्रीने सांगितले की, “मला नेहमीच अध्यात्म आणि साधनेत शांतता मिळते. गेल्या काही वर्षांत मी खूप विचार केला आणि अखेर ठरवलं की आता पूर्णपणे भक्ती आणि ध्यानाच्या मार्गावर चालायचं आहे.”
दीया और बाती हम मालिकेतील तिच्या चुलबुली अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडले होते. या मालिकेतील भाभोला नेहमी चकवा देणारी सून म्हणून तिची ओळख बनली होती. खरंतर, कनिका माहेश्वरीचा सोशल मीडियावर एक व्हिडियो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते - ३ वर्षे आधीच तिने ओशो आश्रममध्ये राहून ६ महिने नियो संन्यास घेतला आहे. या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं सांगितलं, तर काहींनी तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपला निर्णय जाहीर केलाय. कनिकाने सांगितलं की, तिने नियो संन्यास घेतला आहे. ती म्हणते, ही माळ साधारण वस्तू नाहीये. ही माझ्या भगवान ओशोच्या संन्यासाची माळ आहे. मी तर ३ वर्ष आधीच संन्यास घेतला होता. संन्यास म्हणजे नियो संन्यास. जसे की मी आता तुमच्या सोबत बसून बोलत आहे तर मी इथेच आहे. कुठेही गेलेले नाही. जर माझ्या आयुष्यात आपण अशा पद्धतीने जीवन जगत असो कॉन्शियस होऊन तर ...त्यामुळे खूप फर्क पडतो. '
कनिकाने हेदेखील सांगितलं की, ''हा संन्यास घेण्यासाठी तुम्हाला ओशोच्या आश्रममध्ये जावं लागतं. ८-९ दिवसांचा संपूर्ण कोर्स असतो. यामध्ये तुम्ही स्वत: अनुभव करता की, तुम्हाला माळ घालण्याची गरज आहे की नही. यामध्ये वेगवेगळ्या क्रिया असतात, त्या तुम्हाला कराव्या लागतात. मी स्वत: ६ महिन्यांपर्यंत क्रिया केल्या आहेत. माझ्या मैत्रीणीच्या म्हणण्यावरून मी आश्रम गेले आणि तिथे मला वाटलं की, मला गरज आहे माळेची आणि मी ती घेतली.''