सायली संजीव आणि शशांक केतकर अभिनीत ‘कैरी’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून दोघांची ताजी आणि सुंदर केमिस्ट्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
upcoming marathi movie Kairee Trailer released
प्रेम लढायला शिकवतं..लढून जिंकायला शिकवतं.. तुमची परीक्षा घेतं कधी-कधी, पण प्रेम जगायला शिकवतं! अशी कॅप्शन लिहित सायली संजीवने तिचा आगामी चित्रपट कैरीचा ट्रेलर शेअर केला आहे. इन्स्टाग्राम आणि यु-ट्यूबवर हा ट्रेलर पाहता येणार आहे.
कधी रिलीज होणार चित्रपट ‘कैरी’?
यंदा डिसेंबर मध्येच मल्टीस्टारर ‘कैरी’ येणार आहे. १२ डिसेंबर पासून चित्रपटगृहात पाहता येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कैरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातून रोमँटिक थ्रिलर असा नेमका कोणता प्रवास पाहायला मिळणार, याची उत्सुकता ट्रेलरने वाढविली आहे.
ट्रेलरमधून समोर आलेलं कोकणातील नयनरम्य, हिरव्यागार वातावरण झालेलं हे 'कैरी' चित्रपटाच्या शूटिंगने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच शशांक आणि सायलीची केमिस्ट्री फॅन्सच्या पसंतीस उतरली आहे.
कोकणाच्या हिरव्यागार परिसरात त्यांचा रोमँटिक प्रवास खुलताना दिसत आहे. इतकंच नाहीतर कोकणातील लग्नाचा थाटमाटही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. या जोडीच्या रोमँटिक प्रवासाला अचानक ब्रेक लागतो आणि ट्रेलरमध्ये मध्येच आलेला हा टर्न चित्रपटाच्या कथेचे रहस्य उलगडणार आहे. नवरा हरवला म्हणून पत्नीची सुरु असलेली घालमेल ट्रेलरमध्ये दिसत असून हा ट्विस्ट चित्रपटात काय रंगत आणणार हे चित्रपट पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे.
चित्रपटात हे असतील मराठी कलाकार
ट्रेलरमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी आहे. ‘कैरी' या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे.
‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'कैरी'चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाला निषाद गोलांबरे आणि पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी साई पियूष यांनी सांभाळली. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे.