kadak masala chaha recipe Bollywood actor pankaj tripathi adds special ingredient leaf tej patta ginger health benefits
पुढारी ऑनलाईन :
प्रत्येक भारतीयाची सकाळ ही कडक आले घातलेल्या चहानेच होते. यात बॉलीवूड कलाकार कसे मागे राहतील अभिनेता पंकज त्रिपाठी यांनीही त्यांच्या आवडत्या कडक चहाची खास रेसिपी आपल्या चाहत्यांसाठी सांगितली आहे. पाहुया....
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी त्यांची खास कडक मसाला चहा रेसिपी शेअर केली आहे. हा चहा कडक करण्यासाठी ते फक्त अदरक (आले) नाही, तर तेजपत्ता (तमालपत्र) वापरतात. हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि भन्नाट चव मिळवण्यासाठी हा चहा परफेक्ट आहे.
हिवाळ्याच्या थंड सकाळी किंवा संध्याकाळी गरमागरम चहा म्हणजे चहाप्रेमींसाठी वरदानच. एक कप चहा थंडी पळवतो, मूड फ्रेश करतो आणि थकवा घालवतो. प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत वेगळी असते, पण पंकज त्रिपाठी यांचा खास कडक मसाला चहा वेगळाच आहे. तुम्हालाही मसाला चहा आवडत असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
ही चहा चविष्टच नाही तर हेल्दीही आहे आणि घरी बनवायला सोपी आहे. मसाल्यांचा खास तडका तिला साध्या चहापेक्षा वेगळा बनवतो. आले, वेलची, दालचिनी, लवंग यामुळे हा चहा हिवाळ्यात शरीर आणि मन दोन्ही उबदार ठेवतो. ऑफिसमधून परतल्यावर किंवा घरी आराम करताना हा चहा लगेच ऊर्जा आणि ताजेपणा देतो.
पंकज त्रिपाठींच्या चहाची खासियत काय?
त्यांच्या चहातील सर्वात खास घटक म्हणजे तेजपत्ता. साधारणपणे मसाला चहात वेलची, लवंग, अदरक आणि काळी मिरी वापरली जाते; पण तेजपत्ता चहाला खोल आणि समृद्ध चव देतो. तज्ज्ञांच्या मते तेजपत्त्यात हलके अँटीऑक्सिडंट्स असतात आणि तो पचन सुधारण्यास मदत करतो. हिवाळ्यात इम्युनिटीला थोडा सपोर्टही मिळतो.
पंकज त्रिपाठी स्टाइल कडक मसाला चहा – कृती
एका पातेल्यात पाणी उकळा.
वेलची, लवंग आणि अदरक थोडेसे कुटून घ्या; तेजपत्ता वेगळा ठेवा.
पाणी उकळू लागल्यावर कुटलेले मसाले आणि तेजपत्ता घालून 2–3 मिनिटे उकळू द्या.
आता चहा पावडर घाला. रंग गडद झाल्यावर आवडीनुसार दूध आणि साखर घालून काही मिनिटे उकळा.
चहा गाळून गरमागरम सर्व्ह करा.
पंकज यांच्या मते हा चहा पोहा किंवा बिस्किटांसोबत आणखी मजेदार लागतो.
हिवाळ्यासाठी हा चहा का परफेक्ट?
वेलची, लवंग, अदरक आणि तेजपत्ता शरीराला आतून उबदार ठेवतात आणि थंडीत आराम देतात. तेजपत्त्यामुळे चहाला हलकी मातीसारखी, सुकून देणारी चव येते. गरम मसाला चहा पिल्याने शरीरात उष्णता निर्माण होते शिवाय पचन आणि इम्युनिटी वाढण्यासाठीही मदत होते.