Jubin Nautiyal : गुपचूप लग्नानंतर आता जुबिन नौटियाल बनला बाबा; घरी आला छोटा पाहुणा file photo
मनोरंजन

Jubin Nautiyal : गुपचूप लग्नानंतर आता जुबिन नौटियाल बनला बाबा; घरी आला छोटा पाहुणा

‘रातां लंबियां’ फेम जुबिन नौटियालच्या घरी किलबिलाट; गणेश चतुर्थीला झाला मुलाचा जन्म

पुढारी वृत्तसेवा

Jubin Nautiyal Becomes Father, Welcomes A Baby Boy With Wife

पुढारी ऑनलाईन : जुबिन नौटियालच्या घरी चिमुकल्याची किलबिल ऐकू आली असून तो वडील झाला आहे. जुबिनने सांगितले की, त्याचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी असून सर्वजण सध्या एकत्र क्वालिटी टाइम घालवत आहेत.

गायक जुबिन नौटियालच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. त्याची पत्नी ऋचा चंदेलने १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या पहिल्या अपत्याला, म्हणजेच मुलाला जन्म दिला आहे. जुबिन नौटियालने स्वतः याची पुष्टी केली आहे. गायक आणि त्याच्या पत्नीने अद्याप बाळाचे नाव ठरवलेले नाही. बाळ आणि आई दोघेही सुखरूप असून ते घरी परतले आहेत.

जुबिनच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. जुबिन नौटियालने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, घरात आलेल्या या छोट्या पाहुण्यामुळे ते खूप आनंदी आहेत आणि सर्वजण एकत्र क्वालिटी टाइम घालवत आहेत.

कुटुंबासोबत वेळ घालवत आहे जुबिन

जुबिन नौटियालने सांगितले, “अद्याप आम्ही बाळाचे नाव ठरवलेले नाही. सध्या आम्ही त्याच्यासोबत कुटुंबातील सुंदर क्षण जगत आहोत.”

एकीकडे जुबिन आणि त्यांचे कुटुंब खूप आनंदी आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर जुबिनचे चाहते त्याच्याकडे मुलाची झलक दाखवण्याची विनंती करत आहेत. मात्र, त्याची शक्यता कमीच आहे. जुबिन नौटियाल हे अरिजित सिंहप्रमाणेच आपले वैयक्तिक आणि खासगी आयुष्य खासगी ठेवणे पसंत करतात.

बालपणीच्या मैत्रिणीशी झाला होता विवाह

जुबिन नौटियाल याने त्याच्या लग्नाची बातमीही जगापासून लपवून ठेवली होती आणि नंतर लोकांना याबाबत माहिती मिळाली. त्याच्या मुलाच्या जन्माच्या बाबतीतही काहीसे असेच झाले आहे. सांगण्यात येते की, त्‍याने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. याच वर्षी एप्रिलच्या मध्यात एका मिस्ट्री गर्लसोबत त्याचा फोटो व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर हाच फोटो त्यांच्या लग्नाचा असल्याचे सांगितले जात होते.

‘रातां लंबियां’, ‘तुझे कितना चाहने लगे हम’ आणि ‘लो सफर शुरू हो गया’ यांसारखी गाणी गाणारे जुबिन नौटियाल सोशल मीडियावर सक्रिय आहेत. मात्र, ते त्यांच्या खासगी आयुष्याबाबत गोपनीयता राखतात.

जुबिन स्वतःचा बनवलेला नियम मोडणार का?

इन्स्टाग्रामवर जुबिन नौटियालचे १ कोटी २७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याच माध्यमातून जुबिन नौटियाल आपल्या कामाशी संबंधित झलक शेअर करत असतात. मात्र, यावेळी तो आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून स्वतःचा बनवलेला ‘अनस्पोकन रूल’ मोडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

जुबिन नौटियालच्या पत्नीबद्दल बोलायचे झाल्यास, माहितीनुसार त्या जुबिन यांच्या मूळ गावी देहरादूनच्या रहिवासी आहेत. जुबिनने एप्रिल २०२६ मध्ये उत्तराखंडमधील कसौली येथे एका खासगी समारंभात ऋचा यांच्यासोबत गुपचूप आणि पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. या लग्नाची काही छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर लोकांना त्यांच्या लग्नाची माहिती मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT