अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची मुख्य भूमिका असलेला जॉली एलएलबी 3 सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या सिनेमाला रिलीजपूर्वीच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पण सध्या तरी या सिनेमाला लागलेले ग्रहण बाजूला झाल्यासारखे वाटत आहे. अलाहाबाद हायकोर्टाने या सिनेमाच्या रिलीजला परवानगी दिली आहे. (Latest Entertainement News)
अलिकडेच अलाहाबाद कोर्टात या सिनेमाच्या विरोधात याचिका दाखल झाली होती. या सिनेमात एक गाणे आहे ज्याचे काहीसे बोल 'भाई वकील है' असे आहेत. या गाण्याविरुद्ध याचिका दाखल करत सिनेमाचा रिलीज थांबवण्याची मागणी केली गेली होती.
न्यायमूर्ती संगीता चंद्र आणि न्यायमूर्ती ब्रिजराज सिंह यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयांमध्ये असे म्हणले आहे की कोर्टाला या गाण्याच्या बोलांमध्ये किंवा ट्रेलर आणि टीजरमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नाही ज्यामुळे खऱ्या वकिलांच्या पेशाचा अपमान होईल.’ यानंतर कोणताही दंड न आकारता न्यायालयाने ही याचिका रद्दबातल केली.
20 ऑगस्टला पुण्यामध्येही या सिनेमाविरोधात एक नोटिस पाठवली गेली होती. वकील वाजीद खान बीडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ही नोटिस पाठवली गेली होती. या तक्रारीत असे म्हणाले होते की हा सिनेमा न्यायव्यवस्था आणि कोर्टाच्या कामकाजाची खिल्ली उडवत आहे. तसेच न्यायाधीशांना चित्रपटात 'मामू' म्हणून संबोधणे हा कोर्टाचा अपमान असल्याचेही या तक्रारीत म्हणले होते.
याप्रकरणी अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना 28 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याविषयी आदेश दिले आहेत.
जॉली एलएल बी 3 चे दिग्दर्शक सुभाष कपूर आहेत. या सिनेमात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या सोबतच हुमा कुरेशी आणि सौरभ शुकला यांच्या मुख्य भूमिका आहेत.