John Abraham Tehran Trailer out now
मुंबई - जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट 'तेहरान'चा ट्रेलर रिलीज झालाय. 'काय तो देशभक्त होता की देशद्रोही?' अशा टॅगलाईन खाली या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. जॉन या चित्रपटाच्या माध्यमातून ओटीटी वर धुमाकूळ घालायला तयार आहे. स्वातंत्र्य दिनी हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होईल.
जॉन अब्राहम चित्रपट तेहरानमध्ये एक धडाकेबाज दिल्ली पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. जो एक परदेशी मिशनवर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज १ ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात आला आहे.
शुक्रवारी जॉन अब्राहमने इन्स्टाग्रामवर तेहरानचे ट्रेलर शेअर केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय-'क्या तो देशभक्त होता? की गद्दार? या स्वातंत्र्य दिनी सत्य समोर येणार आहे. तेहरानचा ट्रेलर आता रिलीज. १४ ऑगस्ट रोजी जी ५ वर प्रीमियर होईल.'
प्रेक्षकांच्या पसंतीस हा ट्रेलर उतरला आहे. कौतुक करताना एका युजरने लिहिले - असे चित्रपट शोभतात जॉनला. जॉन अब्राहमचा नवा चित्रपट 'तेहरान' एका सत्य घटनेवर आधारित थरारक कहाणी आहे. त्याचे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केलं आहे. दहशतवाद्यांच्या कारवायांना उद्धवस्त करण्यासाठी जॉन तैनात दिसणार आहे. सोबत मानुषी छिल्लर पहिल्यांदाच दिसऩार आहे.
जॉनचा हा आगामी चित्रपट 'तेहरान' चित्रपटगृहात नाही तर ओटीटीवर पाहता येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने १४ ऑगस्ट, २०२५ रोजी रिलीज होईल.