मनोरंजन

सोनी मराठीवरील ‘जीवाची होतिया काहिली’ मालिकेत कानडी तडका

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापूर: सोनी मराठी वाहिनीवर 18 जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जीवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे तर नायिका म्हणून प्रतीक्षा शिवणकर दिसणार आहे. या दोघांची प्रमुख कलाकार म्हणून ही पहिलीच मालिका आहे.

मराठी आणि कानडी भाषांचा मिलाफ यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे. मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. प्रेमाला भाषा नसते, हे त्यातून दिसलं. कानडीचा आणि मराठीचा झकास तडका दुसर्‍या वेळेस बघायला मिळाला. मुख्य कलाकरांबरोबरच आकर्षण ठरले आहेत. नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. विद्याधर जोशी हे अस्सल कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे.

कन्नड आणि मराठी कुटुंब एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्यातही त्यांच्यात होणारं भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. मराठी मालिकेत कानडी तडका पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याने ही प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार, ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. 18 जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शनिवार साडेसात वाजता मालिका नक्की बघा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT