अगस्त्य नंदाची मुख्य भूमिका असलेला इक्कीस या सिनेमाचा ट्रेलर रिलीज  Pudhari
मनोरंजन

Jaya Bachchan Agastya Nanda: मी कुणाचे सहसा कौतुक करत नाही पण....नातू अगस्त्य नंदाच्या 'इक्कीस'चा ट्रेलरनंतर जया बच्चन यांची पोस्ट चर्चेत

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची मुख्य भूमिका असलेला इक्कीस या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला

अमृता चौगुले

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाची मुख्य भूमिका असलेला इक्कीस या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आर्चिसमधून अगस्त्यने डेब्यू केला होता. पण त्याच्या अर्चिसमधील भूमिकेपक्षा ही भूमिका अत्यंत वेगळी आहे. या सिनेमात तो परमवीर चक्र विजेता अरुण खेत्रपाल यांची व्यक्तिरेखा साकारतो आहे. विशेष म्हणजे या सिनेमातून अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया डेब्यू करते आहे. (Latest Entertainment News)Jaya Bachchan post on Ikkis trailer

या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि अगस्त्यवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण या सगळ्यात लक्षवेधी ठरला तो आजी जया बच्चन यांचा मेसेज.

जया यांनी अगस्त्यसाठी खास मेसेज लिहिला आहे ज्यात त्या म्हणतात, ‘ अभिमान. अगस्त्य खूप लवकर नवीन गोष्टी शिकतो. त्याच्या आई वाडिलांपैकी कोणीच अभिनय क्षेत्रात नाहीये. त्यामुळे तो मार्गदर्शनासाठी आजोबा- आजी आणि मामावर अवलंबून आहे.

तुम्ही मला ओळखता मी असेच कुणाचे कौतुक करत नाही. खासकरून माझी मुले आणि नातवंडांचे. पण अगस्त्य खूप स्पेशल आहे. तो स्वत:चा रस्ता बनवण्यासाठी कष्ट करतो आहे. अगदी तसेच जसे मी केले होते. अगस्त्य माझ्यासारखा गर्दीच्या मागे जाणारा नाही.

बिग बींचा नातवासाठीचा मेसेज आहे चर्चेत

बिग बी अमिताभ यांनीही नातू अगस्त्यसाठी खास मेसेज लिहिला आहे. अगस्त्य ! तुझ्या जन्मानंतर लगेच तुला मी कुशीत घेतले होते. काही महिन्यानंतर मी तुला परत कुशीत घेतले तेव्हा तू माझ्या दाढीसोबत खेळत होतास... आज तू जगभरातील थिएटरमध्ये परफॉर्मन्स करत असतोस. तू खास आहेस. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच असणार. तू कायमच स्वत:च्या कामात पुढे रहा. कुटुंबांसाठी कायमच अभिमान बनून रहा.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT