पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत महात्मा गांधी आणि मसुदा समितीचे नेतृत्त्व करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण केलं. यावेळी जान्हवीने दोघांच्यातील पुणे करारावरील चर्चा पाहण्यास आवडेल असे म्हटलं. यानंतर आता शिवसेना पक्ष आणि मराठी अभिनेता किरण माने यांनी जान्हवीचे कौतुक करत इतर स्टार्संना खडेबोल सुनावले आहे.
अभिनेता किरण माने यांनी नुकतेच जान्हवीच्या मुलाखतीचा तो व्हिडिओ शेअर करत तिचे भरभरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओत जान्हवी स्लिव्हलेस बॉऊजसोबत रेड कलरच्या साडीत सुंदर दिसली. तर यावेळी किरण मानेने व्हाईट रंगाच्या शर्टवर निळ्या कलरची शाल गळ्यात परिधान केली होती. ही मुलाखत सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत किरणने 'जान्हवी कपूरनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे ! तिच्याविषयी माझं मतचं बदलून गेलं आहे. एकीकडे मी अनेक अभिनेते- अभिनेत्रींमध्ये ' महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांच्याविषयी खूपच कमी बोलताना ऐकलंय अथवा पाहिलंय. पंरतु, जान्हवीने त्याच्याविषयी जे बोलली त्याने तर मी भारावून गेलो. या तिच्या व्यक्तव्याने मी प्रभावित झालो. काही लोक इतिहास न वाचता अनेक तर्क-वितर्क लाढवत असतात. केवळ सोशल मीडियाच्या माध्यामातून पसरणाऱ्या अफवेवर विश्वास ठेवतात आणि स्वत: चे मत बनवतात, हे चुकिचे आहे. मात्र, या सगळ्याला जान्हवी अपवाद आहे. तसेच सोशल मीडियावर केलेल्या उकीरड्यातल्या कचर्याला आणि प्रोपोगंडा चित्रपटाच्या गटारघाणीला 'इतिहास' मानणार्या अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या तिने सणसणीत मुस्काडात मारली आहे! हे ज्ञान खुप पुस्तकं वाचल्याने आणि मेंदूच्या चिकीत्सक वापरामुळे येतं.' असे म्हटलं आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान 'द लल्लनटॉप' ला दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीला काही प्रश्न विचारण्यात आले. यात खास करून जान्हवीला 'इतिहासातील असा कोणता काळ आहे, जो तुला पुन्हा पहायला आवडेल?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना जान्हवीने सांगितले की, "मला इतिहासाची आधीपासून खूपच आवड आहे. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या घटना समितीचे सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणे खूप महत्त्वाचे वाटते. आंबेडकर आणि गांधी कोणत्या मूल्यांसाठी लढले, याचा देशातील नागरिकांवर कसा परिणाम झाला?, समाजाला कसा फायदा झाला?. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आपल्या समाजाला काय दिलं?" याबद्दलची चर्चा ऐकायची आहे, असे तिने सांगितले.
वक्रफंन्टबद्दल बोलायचे झाल्यास जान्हवी आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत असणार आहे. शरन शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. जान्हवीने तिच्या भूमिकेसाठी १५० दिवसाचे प्रशिक्षण घेतले आहे.
हेही वाचा