Sidharth Malhotra-Janhvi Kapoor First Look released
मुंबई - जान्हवी कपूरच्या झोळीत एकापेक्षा एक चित्रपट असले तरी आता चर्चा आहे तिच्यया परम सुंदरी या चित्रपटाची. त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. 'परम सुंदरी' हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच एक नवीन रोमँटिक ड्रामा पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत. आज गुरुवारी निर्मात्यांनी सरप्राईज दे. परम सुंदरीचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. युटु्यूबवर या लूकचा व्हिडिओ पाहायला मिळत आहे.
'परम सुंदरी' या चित्रपटाचा पहिला लूक मॅडॉक फिल्म्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "तुषार जलोटा दिग्दर्शित वर्षातील सर्वात मोठी प्रेमकथा २५ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. परम सुंदरीचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे." परम सुंदरीच्या पहिल्या लूकबद्दल बोलताना, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर दोघांचीही पहिली झलक दिसते.
सिद्धार्थ कूल लूकमध्ये दिसत आहे. तर जान्हवी दक्षिण भारतीय लूकमध्ये खूपच सुंदर दिसतेय. सोनू निगमचा आवाज फॅन्सना खूप पसंतीस पडला आहे. याशिवाय, अनेक सोशल मीडिया युजर्सनी निर्मात्यांना 'सुन लो अगर' हे गाणे लवकरात लवकर रिलीज करण्याची मागणी केली आहे. एका उत्तर भारतीय मुलगा दक्षिण भारतीय मुलीच्या प्रेमात पडतो, अशी कथा परम सुंदरीची आहे.
हे दोघे पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात काम करत आहेत. मॅडॉक फिल्म्स निर्मित, ही रोमँटिक प्रेमकथा अनुप जलोटा दिग्दर्शित आहे आणि २५ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.