Movie Jan Naygan postpone  instagram
मनोरंजन

Movie Jan Naygan | पोंगलला येणार होता विजयचा शेवटचा सिनेमा, पण ‘जन नायकन’ला मोठा ब्रेक?

Movie Jan Naygan | ५०० कोटींचा विजय थलपतीचा 'जन नायकन'ची रिलीज डेट टळली?

स्वालिया न. शिकलगार

थलपति विजयची अत्यंत अपेक्षित आणि ₹500 कोटींचा जन नायकन या चित्रपटाची रिलीज डेट अचानक टळली आहे. मूव्हीची जनवरी 9, 2026 रोजी पोंगलमध्ये रिलीज होण्याची योजना होती, परंतु सर्टिफिकेशन (CBFC) प्रक्रियेमधील अडचणींमुळे हा निर्णय घेतला गेला आहे. मद्रास हायकोर्टात जारी प्रकरण आणि सेंसर सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे चित्रपट अजून प्रदर्शित होणार नाही आणि नवीन रिलीज डेट अद्याप घोषित झालेला नाही.

तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजयचा आगामी चित्रपट ‘जन नायकन’ सध्या मोठ्या चर्चेत आहे. तब्बल ५०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट विजयच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जात आहे. विशेष म्हणजे, हा विजयचा शेवटचा चित्रपट असू शकतो, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘जन नायकन’ची नियोजित रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट पोंगल सणाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये येणार होता. मात्र, काही तांत्रिक आणि सर्टिफिकेशनशी संबंधित अडचणींमुळे निर्मात्यांनी रिलीज थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

'जना नायकन' ची रिलीज डेट टळल्याची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा युरोप आणि मलेशियामध्ये चित्रपटाच्या डिस्ट्रिब्यूटर्सने ट्विटरवर घोषणा केली की, चित्रपटाचाची रिलीज रद्द करण्यात आली आहे. हा चित्रपट आधी ९ जानेवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार होता. आतापर्यंत निर्मात्यांनी नवी रिलीज डेट जाहीर केलेली नाही.

रिलीजच्या आधी सीबीएफसीने रिलीज सर्टिफिकेट दिलं नव्हतं. या कारणामुळे डेट पुढे ढकलण्यात आली. निर्मात्यांनी रिलीज डेटसाठी मद्रास हायकोर्टात विनंती देखील केलीय. निर्मात्यांनी महटलंय की, यासाठी त्यांनी ५०० कोटींची गुंतवणूक केलीय.

एका रिपोर्टनुसार, कोर्टात जन नायकनच्या निर्मात्याच्या वकिलांनी सांगितले की, “मी या चित्रपटासाठी ५०० कोटी रुपये इन्वेस्ट केले आहेत. ते हलक्यात घेतलं जाऊ शकत नाही. मी ओरडू ओरडून सांगत आहे की, चित्रपट ९ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. आम्ही १८ डिसेंबर रोजी सर्टिफिकेशनसाठी अॅप्लाय केला होता आणि तत्काळमध्ये ही ॲप्लाय केला होता.”

याआधी रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, जन नायकन ३८० कोटींच्या बजेटमध्ये बनले आहे. यासाठी विजयला २२० कोटी रुपये मिळाले आहेत. दिग्दर्शक एच विनोदने २५ कोटी रुपये फी घेतली आहे. अनिरूद्ध रविंद्रचरना बॅकग्राउंड स्कोर आणि गाण्यांसाठी १३ कोटी रुपये फी दिली आहे. बॉबी देओल आणि पूजा हेगडेला ३ कोटी रुपये फी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT