मनोरंजन

“जय जय शनिदेव” मालिका आजपासून भेटीला; कलाकारांनी घेतले शनी शिंगणापूर येथे दर्शन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका 'जय जय शनिदेव' आजपासून पाहायला मिळणार आहे. जीवनात सुख, शांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेव' यांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहे. मालिकेच्या प्रदर्शनापूर्वी मालिकेच्या कलाकारांनी आणि निर्मात्यांनी शनी शिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेतले. निर्माते आणि लेखक संतोष अयाचित आणि शनिदेवांच्या भूमिकेत असलेले संकेत खेडकर हे सहभागी झाले.

त्यांनी शनी शिंगणापूर येथे दर्शन घेतले आणि मालिकेनिमित्त छोटेसे हवन देखील केले. त्यानंतर कलाकारांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली. या वेळी श्री शनेश्वर देवस्थान शनि शिंगणापूर यांचा मोठा हातभार लाभला. त्याशिवाय अध्यक्ष भागवत सोपान बानकर, उपाध्यक्ष विकास नानासाहेब बानकर, सरचिटणीस बाळासाहेब बोर्डे, चिटणीस आबासाहेब शेटे मा. आ. शंकरराव गडाख, नितीन शेटे हे देखील उपस्थित होते.

जय जय शनिदेव मालिकेच्या टीमने शनि शिंगणापूर येथे दर्शन घेतले

सूर्यपुत्र, न्यायदाते, आणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेव यांची महागाथा ८ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्याच दिवशी १ तासाचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. शनिदेवांचे निरनिराळे अध्याय या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडले जातील. विक्रमादित्य यांची गोष्ट आपल्याला मालिकेच्या सुरुवातीच्या भागांत पाहायला मिळणार आहे. शनिदेवांच्या भूमिकेत अभिनेता संकेत खेडकर दिसणार आहे तर महादेवांच्या भूमिकेत अभिनेता त्रिशुल मराठे आपले पदार्पण करत आहे. संतोष अयाचित यांच्या लेखणीच्या पेटार्‍यातून आणखीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यांच्या लेखणीतून 'जय जय शनिदेव' मालिकेचे लेखन होणार आहे. संतोष अयाचित हे मालिकेचे निर्मातेदेखील आहेत.

'जय जय शनिदेव', ८ मे पासून रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

हेदेखील वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT