Jacqueline Fernandez's bodyguard grabs attention during protect actress  pudhari photo
मनोरंजन

Jacqueline Fernandez’s Video : 'बिना टच किए प्रोटेक्ट कर', 'मर्यादा का ओलांडल्या?' , अंगरक्षकाने जॅकलिनचे मनगट पकडताच सोशल मीडियावर वाद, प्रसंग व्हिडिओत कैद

Jacqueline Fernandez’s Video : 'बिना टच किए प्रोटेक्ट कर', 'मर्यादा का ओलांडल्या?' , अंगरक्षकाने जॅकलिनचे मनगट पकडताच सोशल मीडियावर वाद, प्रसंग व्हिडिओत कैद

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. गर्दीतून मार्ग काढताना तिच्या अंगरक्षकाने तिचे मनगट पकडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या कृतीवर काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेत 'बिना टच किए प्रोटेक्ट कर' आणि 'मर्यादा का ओलांडल्या?' अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी अंगरक्षकाची बाजू घेत त्याने सुरक्षेच्या दृष्टीने काम केल्याचे म्हटले आहे.

जॅकलिन फर्नांडिसच्या अंगरक्षकाने तिला चाहत्यांपासून दूर नेण्यासाठी मनगट पकडल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. आठवड्याच्या शेवटी जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये जॅकवीनचा अंगरक्षक तिच्या भोवती तिचे संरक्षण करताना दिसतो.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस गेल्या काही दिवसांपासून एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका प्रतिष्ठित कार्यक्रमादरम्यान घडलेल्या घटनेने सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण केला आहे. व्हिडिओमध्ये जॅकलिन चाहत्यांसोबत संवाद साधत आणि छायाचित्रांसाठी थांबलेली दिसते. त्याचवेळी तिचा अंगरक्षक गर्दी वाढत असल्याने तिला तिथून बाजूला नेण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

या प्रसंगात अंगरक्षकाने जॅकलिनचे मनगट धरून तिला पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र अभिनेत्रीने घाई न करता चाहत्यांसोबतचे फोटोसेशन पूर्ण करण्यावर भर दिला. काही क्षणांसाठी तिने आपली जागा सोडण्यास नकार दिल्यासारखेही जाणवले. त्यामुळे सुरक्षेची जबाबदारी आणि व्यक्तीच्या वैयक्तिक मर्यादा यांमध्ये समतोल कसा राखावा, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली.

व्यावसायिक सुरक्षा आणि वैयक्तिक सीमांचे उल्लंघन यांमधील रेषा नक्की कुठे आहे, असेही काहींनी म्हटले. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी अंगरक्षकाच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. काहींचे मत होते की सुरक्षा राखणे आवश्यक असले तरी संबंधित व्यक्तीला हात लावणे योग्य नाही. "संरक्षण करा, पण अनावश्यक स्पर्श टाळा," ''बिना टच किए प्रोटेक्ट कर'', ''मर्यादा का ओलांडल्या?'' अशा स्वरूपाच्या कॉमे्टंस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या.

(व्हिडिओ- BackUp Videos x account वरून साभार)

दुसरीकडे काहींनी अंगरक्षकाची बाजू घेतली. त्यांचे म्हणणे आहे की, मोठ्या गर्दीत सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी काही वेळा तत्काळ निर्णय घ्यावे लागतात. अनेक कलाकार आपल्या सुरक्षारक्षकांना आधीच स्पष्ट सूचना देतात. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अंगरक्षकाने केलेली कृती ही त्याच्या कर्तव्याचा भाग असू शकते.

दरम्यान, जॅकलिनच्या आगामी प्रोजेक्टबाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. ती लवकरच 'वेलकम टू द जंगल' या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अनेक कलाकार एकत्र झळकणार आहेत. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, आफताब शिवदासानी, जॅकी श्रॉफ आणि परेश रावल यांचा या चित्रपटात समावेश आहे. अहमद खान दिग्दर्शित चित्रपटात तब्बल ३४ हून अधिक कलाकार असणार आहेत. शिवाय जॅकलिन एका नव्या हॉरर चित्रपटात भूमिका साकारू शकते, असे म्हटले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT