मनोरंजन

Ira khan : आमिरच्या मुलीचा ब्लॅक स्विमसुटमध्ये मित्रांसोबत एन्जॉय

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ( Ira khan ) फिल्मी करिअरपासून दुर असली तरी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी आपले बिकिनीतील आणि हॉट फोटो शेअर करत असते. सध्या मुंबईत उन्हाचा कडाका वाढल्याने इरा खान स्विमींग पूलामध्ये उतरली. इतकेच नव्हे तर तिने मित्रासोबत मौजमस्ती देखील केली आहे.

आमिरची मुलगी इराने ( Ira khan ) नुकतेच इंन्स्टाग्रामवर स्विमींग पूलामध्ये एन्जॉय करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत इरा ब्लॅक स्विमसुटमध्ये स्विमींग पुलीमध्ये पार्टी करताना दिसली आहे. यावेळी तिच्यासोबत खास उत्साहीत मित्रमैत्रिणी दिसल्या. या फोटोत इरा नेहमीपेक्षा खूपच ग्लॅमरस आणि पाण्यात हॉट दिसत होती.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'आम्ही स्विमवेअर मॉडेल बनू शकतो. विनाकारण पूलमध्ये, विशेषत: या उन्हाळ्यात'. असे लिहिले आहे. यावरून इराने स्विमवेअर मॉडेल बनणार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. यातील एका फोटोला पोझ देताना इराने आपल्या मित्राला खायला भरवताना दिसत आहे. यावेळी तिच्या डोळ्यावर चष्मा देखील दिसत आहे. या सगळ्यावरून मुंबईत सध्या उन्हाळाचा कडाका वाढला असल्याने इरा स्विमिंग पुलामध्ये पोहोण्यास उतरल्याचे समजते. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सनी भरभरून कॉमेन्टस करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री त्रिधा चौधरीने 'Absolutely ?'असे म्हटले आहे. तर एका युजर्सने 'You are???? very beautiful ❤❤❤'. 'Cool….?❄'.'Very nice pic ❤️❤️', 'Amazing shoot ?❤️'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'So hot ?❤️','???uff','Uff hiii girmi??,'आणि 'खूपच सुंदर दिसतेस ??'. असे म्हटले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

याआधी इरा बोल्ड लूकमुळे चर्चेत आली होती. यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. इराचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. चाहत्यांनी काही वेळी इराचे कौतुक केले आहे. तर काहीवेळा तिला बोल्ड फोटोमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. इराला वडिलांप्रमाणे अभिनयात करिअर करायचे नाही तर तिला दिग्दर्शनात रस आहे. इराने २०१९ मध्ये एका नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना यांना इरा आणि जुनैद अशी दोन मुले आहेत. तर आमिरची दुसरी पत्नी किरण रावला आझाद राव खान नावाचा एक मुलगा आहे. आमिर आणि रीना काही वैयक्तीक कारणांनी २००२ मध्ये विभक्त झाले. आमिरने गेल्या वर्षी किरणसोबतचे नाते तोडल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु, ठोस काही माहिती मिळालेली नाही.

आमिर खानही सध्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दिसणार आहे. याशिवाय मोना सिंग आणि नागा चैतन्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT