Salim Khan Aditya Pancholi Fraud News pudhari
मनोरंजन

Fraud Case: पांचोली, सलमानच्या वडिलांना गंडवलं... त्याच पैशानं ४ वेळा केलं लग्न, अखेर १५ वर्षांनी तो 'गुजराती' नटवरलाल गजाआड

Interstate Gold Coin Fraud Case: अशिक्षित टोळी सुशिक्षितांना करायची टार्गेट, सोन्याच्या नाण्यांचे अमिष दाखून गंडवायचे

Anirudha Sankpal

Salim Khan Aditya Pancholi Fraud News: पोलिसांनी आंतरराज्यीय गोल्ड कॉईन फ्रॉड केस प्रकरणी चार लोकांना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी २ कोटी पेक्षा जास्त कॅश आणि ६७८ ग्रॅम सोनं जप्त केलं आहे. या चार आरोपींमध्ये सोलंकी प्रभुभाई गुलशनभाई उर्फ कल्पेश देखील सामील आहेत. हा मुळचा गुजरातमधील वडोदराचा रहिवासी आहे. तो या टोळीचा म्होरक्या असल्याचं सांगितलं जात आहे.

पांचोली अन् सलीम खान यांनाही गंडवलं

डेप्युटी कमिश्नर ऑफ पोलीस (गुन्हे शाखा) हितेश यादव यांनी या कारवाईची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, 'जवळपास १५ वर्षापूर्वी प्रभुभाईने बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोलीकडून २५ लाख तर सलमान खानचे वडील सलीम खान यांच्यासोबत २० लाख रूपयांचा फ्रॉड केला होता. या फ्रॉडमधून मिळालेल्या पैशाने प्रुभभाईने तब्बल ४ वेळा लग्न केलं होतं. आणि लव यू या नावाचा एक गुजराती चित्रपट देखील तयार केला होता.'

चौघांना घेतलं ताब्यात

या प्रकरणी पंकज शर्मा (निहाल विहार दिल्ली), मनीष कमलेश शाह (करेली बाग वडोदरा) आणि इश्वर मारवाडी (रामदेव नगर, वडोदरा) या इतर तीन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभुभाई आणि पंकज शर्मा यांना गुरूग्राममधून अटक करण्यात आली. तर मनिष आणि ईश्वर यांना गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, प्रभुभाई गेल्या २५ वर्षापासून लोकांना फसवत आहे. त्याने हे फ्रॉड मुंबई आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात केले आहेत. पोलिसांनी सांगितलं की या फ्रॉडच्या पैशातूनच त्याने दिल्ली मुंबई रोडवर करजन लकोदरामध्ये हॉटेल पीएम खरेदी केलं होतं.

हितेश यादव यांनी सांगितलं की प्रभुभाई गुजरात नगर परिषद निवडणुकीत आपली पत्नी पार्वती सोलंकी यांच्यासाठी तिकीट मिळवून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणार होता.

टोळी कसं काम करत होती?

यादव यांनी सांगितलं की ही टोळी सहसा सुशिक्षित लोकांना टार्गेट करत होते. या टोळीतील अनेक सदस्य हे अशिक्षित होते आणि गरीब कामगाराचा वेश धारण करून ते आपल्या जवळ ५ ते ६ खरी सोने चांदीची नाणी आपल्याजवळ ठेवत होते. ते श्रीमंत लोकांना ही नाणी दाखवून ते खुदाई काम करताना हे मिळाले असल्याचं सांगत.

टोळीतील एक सदस्य या नाण्यांना खरं असल्याचा पुरावा देता यावा म्हणून आपल्या सोबत खऱ्या सोन्याची नाणी बाळगत होता. एकदा का हे सोनं खरं असल्याचं सिद्ध झालं की ते त्याची किंमत २५ ते ३० लाख रूपये प्रतिकिलो सांगत आणि डील फायनल झाल्यावर टोळीतील इतर सदस्य खऱ्या सोन्याच्या नाण्यांऐवजी सोन्याचं पाणी दिलेली तांब्याची नाणी देत आणि पैसे घेऊन फरार होत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT