हिना खानने ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती शेअर केली आहे  Hina Khan Instagram
मनोरंजन

Hina Khan Breast Cancer | हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर, पोस्ट व्हायरल

हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर; उपचार सुरू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तिने स्वत: पोस्ट करून खुलासा केला आहे. आता तिची ही पोस्ट पाहून सर्वांना धक्का बसला आहे.

ती कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर आहे. तिने सोशल मीडियावर स्वत: ही माहिती शेअर केली आहे. तिने सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना सांगितले की, तिच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद.

हिना खानला तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर

हिना खान कॅन्सरने पीडित आहे. तिने ब्रेस्ट कॅन्सर विषयी लिहिलंय की - माझ्या बाबतीत काही अफवा सुरु आहेत. मी तुम्हा सर्वांना एक आवश्यक बातमी शेअर करायची आहे. 'खासकरून त्या लोकांशी जे माझ्यावर प्रेम करतात. माझी परवा करतात. मला ब्रेस्ट कॅन्सर आहे. तिचा तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर आहे.

तिच्यावर उपचार सुरु असल्याचे तिने कळवले आहे. अनेक संकटांशी लढल्यानंतर मी विशावस व्यक्त करत आहे की, मी ठिक आहे. मी या आजाराशी लढण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. यावेळी मी ती प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे, जी मला खूप मजबूत बनवेल.'

हिना म्हणाली, तिच्या प्रायव्हेसीकडे लक्ष द्यावे. मला तुमच्या प्रेम आणि सन्मानाचा आदर आहे. मला आणि माझ्या परिवाराला पूर्ण विश्वास आहे की, कॅन्सरशी लढा देऊन लवकर ठिक होईन. तोपर्यंत थोडं लक्ष द्या. मला यावेळील तुमचं प्रेम आणि आशीर्वादाची खूप गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT