Imran Khan Case pudhari
मनोरंजन

Imran Khan Case : आधी पुराव्याचे कागदपत्र जमा करा... इम्रान खानने मुंबई पोलिसांवर डाव टाकला

नोटिशीला उत्तर देताना इम्रान खानने फक्त आपली बाजूच मांडली नाही तर तपास अधिकाऱ्यांवरच उलटा डाव टाकला आहे.

Anirudha Sankpal

Imran Khan Case : बॉलीवूड अभिनेता इम्रान खानच्या नागरिकत्वावरून वाद सुरू झाला आहे. इम्रान खानने १७ ऑक्टोबर रोजी फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO) कडून आलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर दिलं आहे. मात्र हे उत्तर देताना इम्रान खानने फक्त आपली बाजूच मांडली नाही तर तपास अधिकाऱ्यांवरच उलटा डाव टाकला आहे. त्याने संबंधित अधिकाऱ्यांनाच काही प्रश्न विचारले आहेत.

तर कसा बचाव करणार?

इम्रानने स्पष्ट केलं की जर माझे OCI रजिस्ट्रेशन रद्द करण्यासारख्या मोठ्या कारवाईचा विचार होत आहे तर मला त्याआधी याबाबतचे सर्व कागदपत्र आणि पुरावे दाखवले पाहिजेत. तुम्ही कोणत्या आधारावर हे पाऊल उचलत आहात. इम्रानने थेट प्रश्न विचारला की जोपर्यंत मला माहिती नाही की माझ्याविरूद्ध कोणत्या आधारावर केस तयार करण्यात आली आहे तोपर्यंत मी माझा बचाव कसा करणार?

इम्रान खानचा थेट सलाव

एमजीएम लीगल द्वारे इम्रान खानने आपलं उत्तर दिलं आहे. इम्रान खानने नियमानुसार कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी फक्त कारवाई कोणत्या कारणाने करतोय हे सांगणे पुरेसे नाही. अधिकाऱ्यांना त्याबाबतचे पुरावे आणि कागदपत्राची देखील माहिती देणे गरजेचे आहे. ते कोणत्या आधारावर हे मत तयार केलं हे सिद्ध करावे लागते.

अर्ध्या माहितीवर माझ्याकडे उत्तर मागू नका

इम्रान खान याच्या मते संबंधित व्यक्तीला पूर्ण माहिती देणे गरजेचे असते. कारण त्याच्यावरील आरोप त्याला समजतील. त्याचे तो उत्तर देऊ शकले. गरज लागल्यास त्यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करू शकेल. त्यामुळं इम्रान खान FRR0 कडून संपूर्ण प्रकरण ठेवण्याची मागणी केली आहे. तुम्ही अर्ध्या माहितीवर माझ्याकडून उत्तर मागू नका असे इम्रानचे म्हणणे आहे.

यात इम्रान खानने मुंबई पोलीसांच्या रिपोर्टचा देखील विशेष उल्लेख केला आहे. त्याचे म्हणणे आहे की ज्या कागदपत्रांच्या आणि दुसऱ्या सामुग्रीच्या आधारे तुम्ही निपोर्ट तयार केली आहे. ती कागदपत्रे पूर्णपणे उपलब्ध करून देलेली नाहीत. इम्रानने आपल्या उत्तरात मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात जमा केली गेलेली रिपोर्ट तसेच इतर सामुग्री त्याला देण्यात आलेली नाही असं सांगितलं. इम्रान खानने याबाबतची कागदपत्रे मिळाली पाहिजे कारण हे प्रकरण माझ्या अधिकारांबाबत आहे.

मुंबई पोलिसांवरही टाकला उलटा डाव

इम्रान खानने या प्रकरणी माझी बाजू जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला गेला नाही. त्यांच्या मते FIR दाखल होण्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. इम्रान खानने जर मुंबई पोलीस या प्रकरणाचा रिपोर्ट तयार करून FRRO ला पाठवला आहे तर त्यात माझा जबाब देखील असला पाहिजे.

कोणत्याही प्रकरणात निष्पक्ष निर्णय घेण्यासाठी सर्व पक्षांचे म्हणणे ऐकणे गरजेचे आहे. जर एकाच पक्षाने दिलेल्या माहितीच्या आधारावर रिपोर्ट तयार केला गेला असेल दुसऱ्या पक्षाला त्याचे म्हणणे ठेवण्याची संधीच मिळाली नसेल तर या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होणे सहाजिक आहे असे मत देखील इम्रान खानने नोंदवलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT