Yudhavir Ahlawat  pudhari
मनोरंजन

Yudhvir Ahlawat IMDb: शाहरूख, विजय पासून ऐश्वर्यापर्यंत सगळे 'या' मुलासमोर फिके... IMDb यादीत युद्धवीर अहलावतचा डंका

Anirudha Sankpal

IMDb Popular Indian Celebrities: द इंटरनेट मुव्ही डेटाबेस प्रत्येक आठवड्यात भारतातील सर्वात प्रसिद्ध सेलेब्रिटींची यादी जाहीर करते. ही यादी इंटरनेट युजर संबंधित सेलेब्रिटींच्या प्रोफाईलला किती वेळा भेट देतात त्यावरून काढली जाते. त्यामुळं ज्या अभिनेते अभिनेत्रींचे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला असतात किंवा ऑनलाईन स्ट्रीम झालेली असतात त्यांचा या यादीत दबदबा निर्माण होतो.

मात्र या आठवड्यात imd इंडियाने जाहीर केलेल्या यादीत एक अपरिचीत नाव आहे. आयएमडीने नुकतेच टॉप ३० प्रसिद्ध सेलेब्रिटींची यादी जाहीर केली. त्यात सर्वात वरच्या नंबरवर एका मुलाचे नाव आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे या मुलाने सुपरस्टार थलपती विजय, मोहनलाल, ऐश्वर्या राय, एनटीआर यांना देखील मागं टाकलं आहे.

आयएमडीच्या सर्वात प्रसिद्ध सेलेब्रिटींच्या यादीत या आठवड्यात अभिनेता युद्धवीर अहलावत टॉपवर आहे. या तरूण अभिनेत्याने नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेल्या कर्तव्य या चित्रपटात काम केलं आहे. यात सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. युधवीरनं १४ वर्षाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. युधवीरचा या चित्रपटातील अभिनय दमदार झाला आहे. त्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. त्यामुळं त्याच्या आयएमडी प्रोफाईलवर अनेकांनी व्हिजिट केले आहे. कर्तव्य हा १५ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे.

युद्धवीर हा मुळचा हरियाणाचा असून त्याने २०१९ मध्ये सांड की आँखमधून आपला अभिनयाचा प्रवास सुरू केला. तेव्हापासून तो लव्ह हॉस्टेल आणि वेब सिरीज Co-Ed मध्ये दिसला आहे. आता तो कर्तव्यमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. युद्धवीरने जरी तो खूप बालीश दिसत असला तरी तो काही अल्पवयीन नाहीये असा खुलासा केला होता.

युद्धवीरने सर्वाधिक प्रसिद्ध सेलेब्रिटी IMDb च्या यादीत ऐश्वर्या राय ( तिसऱ्या क्रमांकावर), विजय थलपती (चौथ्या क्रमांकावर), ज्युनियर एनटीआर ( २४ व्या क्रमांकावर) आणि शाहरूख खान यांना मागं टाकलं आहे.

IMDb यादी कशी तयार करते?

IMDb ने दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर ट्रेंड होत असलेले भारतीय स्टार यात अभिनेता, दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर आणि लेखक यांची यादी करते. या कलाकारांच्या प्रोफाईल पेजवर किती व्हिजीट आल्या आहेत. यावरून ही यादी तयार केली जाते. ही मोजदात कालबद्ध असते. जागभरातून २५० मिलियनपेक्षा जास्त चाहते यावर व्हिजीट करत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT