मुंबई - इब्राहिम अली खानचा चित्रपट 'सरजमीन' आज जियो हॉटस्टारवर स्ट्रीम झाला आहे. इब्राहिम आणि काजोल, पृथ्वीराज सुकुमारन यांच्या या चित्रपटाची चर्चा होताना दिसतेय. इब्राहिमचे घर, संपत्ती, शिक्षण किती झाले आहे, हे थोडक्यात जाणून घेऊया.
इब्राहिम अली खान हा बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांचा मुलगा आहे. तर अभिनेत्री सारा अली खानचा धाकटा भाऊ आहे. त्याचा जन्म ५ मार्च २००१ रोजी झाला. तो दिग्गज क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा नातू आहे.
इब्राहिमने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. अभिनयातील प्रशिक्षण घेण्यासाठी न्यू-यॉर्कमधील चित्रपट ॲकेडमीमध्ये प्रवेश घेतला होता. त्याने रॉकी और रानी की प्रेम कहानी या २०२३ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तो करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित नादानियां या रोमँटिक कॉमेडीशी जोडला गेला आहे. या चित्रपटातून त्याने रोमँटिक डेब्यू केला होता. पण, त्याची जादू फारशी चालली नाही.
इब्राहिम हुबेहुब वडील सैफ अली खानसारखा दिसतो. इब्राहिमचा संबंध पटौदीच्या नवाब खानदानासी असल्यामुळे त्याला नवा नवाब देखील म्हटलं जातं.
इब्राहिम अली खान मुंबईतील जुहू परिसरात राहतो. एका अपार्टमेंटमध्ये तो आई अमृता सिंह आणि बहिण सारा अली खान सोबत राहतो. रिपोर्टनुसार, त्याच्या घराची किंमत जवळपा, १.५ कोटी रुपये आहे.
रिपोर्टनुसार, इब्राहिम अली खानची संपत्ती जवळपास २०-२५ कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. मीडियानुसार, इब्राहिम अली खान Men's Shoes, Clothing & Accessories असणाऱ्या एका ब्रँडचा ॲम्बेसेडर आहे.
सरजमीन स्ट्रीमिंगच्या दरम्यान इब्राहिम अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. य व्हिडिओमद्ये तो एका फॅनसोबत बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्याच्यावर फिदा आहे.
या व्हिडिओमध्ये इब्राहिम पब्लिक प्लेसमध्ये दिसतोय. त्याच्या अवतीभोवती फॅन्स आहेत. त्यातील एका फॅनसोबत तो इशाऱ्यांनी बोलताना दिसतो. कारण, तो तरुण फॅन बोलू शकत नाही. तो प्रेमाने त्या फॅनशी इशाऱ्यांद्वारे बातचीत करताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव करत आहेत.