संगीत: प्रीतम
कोरिओग्राफी: बॉस्को लेस्ली मार्टिस
हिंदी आवृत्ती:
गायक: सचेत टंडन, साज भट्ट
गीतकार: अमिताभ भट्टाचार्य
तेलुगु आवृत्ती:
गायक: नकाश अज़ीज़, याजिन नज़ीर
गीतकार: कृष्णा कांत
तमिळ आवृत्ती:
गायक: नकाश अज़ीज़, याजिन नज़ीर
गीतकार: मधन कार्की
Hrithik Roshan and Jr NTR's Dance Battle in war 2
मुंबई - यशराज फिल्म्सने अखेर स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रतीक्षित‘वॉर 2’ चित्रपटातील डान्स ‘जनाब ए आली’ची पहिली झलक रिलीज केली आहे. ऋतिक रोशन आणि ज्यु. एनटीआर या दोघांमध्ये डान्स बॅटल रंगणार आहे. प्रचंड उत्साह, डान्सची शैली आणि अभिनय यांचा मिलाफ पाहायला मिळणार आहे. गाण्याला संगीत प्रीतम, तर गायक सचेत टंडन आहेत. साज भट्ट आणि गीतलेखक अमिताभ भट्टाचार्य आहेत.
इन्स्टाग्रामवर गाण्याचा एक फोटो शेअर करत यशराज फिल्म्सने पोस्टला कॅप्शन दिली की- डान्स फ्लोरवर देखील युद्ध होईल! उद्या डान्स स्पर्धेची एक झलक पाहा, जे तुम्ही केवळ मोठ्या पडद्यावर पाहू शकता. जेव्हा १४ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहात हिंदी, तेलुगु आणि तमिळमध्ये 'वॉर २' रिलीज होईल!"
आदित्य चोप्रा यांनी पुन्हा एकदा ‘कजरा रे’ (बंटी और बबली) आणि ‘कमली’ (धूम 3) सारखी स्ट्रॅटेजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जनाब ए आली’ हे गाणं पूर्णपणे ऑनलाईन रिलीज न करता केवळ चित्रपटगृहातच दाखवले जाईल. जेणेकरून प्रेक्षकांना ऋतिक आणि एनटीआर यांना एकत्र डान्स करताना पाहण्याचा अफलातून अनुभव प्रेक्षकांना घेता येईल.
हीच स्ट्रॅटेजी यशराजने याआधी ‘कजरा रे’ आणि ‘धूम 3’ मध्ये वापरली होती. आणि या गाण्यांनी थिएटरमध्येच धमाका केला होता. ‘वॉर २’ चे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. ऋतिक-ज्यु. एनटीआरसह कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. ‘वॉर २’ १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.