ठळक मुद्दे
हनी सिंह-करण औजला यांच्या गाण्यात आक्षेपार्ह शब्दांचा वापर
पंजाब महिला आयोगाने पाठवली नोटीस
आयोगाचे हजर राहण्याचे दोन्ही गायकांना आदेश
Karan Aujla -Honey Singh issued legal notice
मुंबई - गायक करण औजला आणि हनी सिंहने आपल्या गाण्यात महिलांच्या प्रति अपमानजनक आणि आपत्तीजनक भाषेचा वापर केल्याने कायदेशीर वादात अडकले आहेत. याप्रकरणी पंजाब राज्य महिला आयोगाने कारवाई करत दोन्ही कलाकारांना नोटिस जारी केली आहे. त्यांना ११ ऑगस्ट, २०२५ रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
करण औजलाचे रिलीज झालेले गाणे "एमएफ गबरू"मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेच्या वादात सापडले आहे. आयोगाने डीजीपींना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
"एमएफ गबरू" १ ऑगस्ट, २०२५ रोजी रिलीज झालं आहे. करण औजलाने हे गाणे लिहिलं आहे तर इक्कीने संगीत दिलं आहे. हा व्हिडिओ यु-ट्यूबवर आतापर्यंत ३० लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आलं आहे. दरम्यान, हनी सिंह २०२४ चा कमबॅक अल्बम 'ग्लोरी'चे गाणे 'मिलियनेयर' वरून देखील निण्यावर आहे. महिला आयोगाने गायक-रॅपर यो-यो ला देखील नोटिस जारी केलं आहे. हनी सिंहला ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये १८-ट्रॅक असणारा अल्बम 'ग्लोरी' रिलीज झाला होता. यामध्ये 'मिलियनेयर', 'पायल', 'जट्ट महकमा', 'बोनिता', 'हाई ऑन मी' यासारखी गाणी होती. हा अल्बम गुलशन कुमार आणि टी-सीरीजने प्रस्तुत केला होता.
याविषयी बोलताना आयोगाचे अध्यक्ष राज लाली गिल म्हणाले, "अशा भाषेचा वापर करणाऱ्यांना सहन केलं जाणार नाही. यासाठी मी दोघांना इशारा दिला आहे.या गाण्यांवर प्रतिबंध लावला जाईल. गायक समाजाचा आवाज असतो." ते पुढे म्हणाले, ''एकीकडे ते म्हणतात की, ते आपल्या आईशी खूप प्रेम करतात. आणि दुसरीकडे ते महिलांबद्दल आक्षेपर्हा भाषेचा वापर करतात.''