Hina Khan Wedding photos viral
मुंबई : अभिनेत्री हिना खानच्या फॅन्ससाठी एक आनंदाची वार्ता आहे. तिने तिचा लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड रॉकी जायसवालशी गुपचुपपणे लग्न केलं आहे. हे लग्न खासगी ठेवण्यात आले होते. हिना - रॉकीचे हे लग्न वैयक्तिकपणे पार पडले. कपलने आपल्या लग्नाचे काही फोटोज फॅन्स सोबत शेअर केले आहेत.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये तिने अक्षराची भूमिका साकारली होती. हिना खान सध्या कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंजत आहे. अशा वेळी, तिने लग्नाचे वृत्त देऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हिना आणि रॉकी यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे म्हटले जात आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत आणि चाहते त्यांना खूप शुभेच्छा देत आहेत. हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहे.
''दोघांचे लग्न झाले, आमच्या प्रेमाची दुनिया निर्माण झाली. आमचे मतभेद कमी झाले, आमची हृदये एकत्र आली, दीर्घायुष्यासाठी एक बंधन तयार झाले. आम्ही आमच्या घरात आहोत, आम्ही आमच्या प्रकाशात आहोत, आम्ही आमच्या आशेत आहोत आणि एकत्र आहोत, आम्ही सर्व अडथळे पार करतो. आज, आमचे मिलन प्रेम कायमचे बंधनात अडकले आहे. पत्नी आणि पती, मी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो.''
हिना खानने तिच्या लग्नात इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली ओपल ग्रीन साडी नेसली होती. यासोबत अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला होता. डोक्यावर गुलाबी रंगाचा दुपट्टा घालून ती पारंपरिक वधूसारखी दिसत होती. हिना खानने गोल्डन दागिने आणि ओपन हेअरस्टाईल केली होती. अभिनेत्रीच्या हातावर आणि पायांवर मेहंदीचा सुंदर रंग देखील खुलला होता.
हे लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहेत. चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि चाहते त्यांना खूप शुभेच्छा देत आहेत. फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत.