हिना खान पुन्हा शूटिंगवर परतली आहे Hina Khan Instagram
मनोरंजन

केसांना विग, हसतमुख चेहऱ्याने हिना खान परतली कामावर

कीमोथेरेपीची जखम लपवत हिना खान कामावर परतली

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत आहे. तिच्यावर कीमोथेरेपी सुरु आहे. आता ती पुन्हा कामावर परतली आहे. केसांना विग, चेहऱ्यावर हास्य दाखवत ती पुन्हा काम करत आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून तिने My first work assignment after my diagnosis..अशी कॅप्शन लिहिलीय.

कीमोथेरपीच्या आधी हिना खानने आपले केस छोटे केले आहेत. ती शूटसाठी आपल्या कीमोथेरपीचे निशाण लपवण्याचा प्रयत्न करत आहे. इतकेचं नाही तर तिने विगदेखील घातलेले दिसते. साधना कट स्टाईलमध्ये हा विग आहे.

आता तिने एक लेटेस्ट पोस्ट केली आहे. ती तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरने पीडित आहे. तरीही ती कीमोथेरपी घेऊन शूटवर जात आहे. तिने एक मोठी पोस्ट लिहिली आहे. कामावर जाताना तिने तयार होतानाचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनला हिना खानची लांबलचक पोस्ट

व्हिडिओसोबत तिने कॅप्शन लिहिलीय की, 'माझ्या डायग्नोसिस नंतर माझं पहिलं काम असाइनमेंट. जेव्हा जीवनात सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतो. तेव्हा बोलण्याच्या हिशेबाने चालणे आणखी चॅलेंजिग होतं. म्हणून वाईट दिवसांमध्ये स्वत:ला आराम द्या. कारण असे करणेचं, योग्य आहे. तुम्ही हे डिझर्व्ह करता. पण, चांगल्या दिवसांमध्ये आपले जीवन जगणेदेखील विसरु नये. मग ते जीवन छोटे का असेना. हे दिवस आजदेखील खूप महत्त्वाचे ठरतात. बदल स्वीकारा...'

हिना खान पुन्हा शूटिंगवर

हिना खानने पुढे लिहिलंय, 'मी माझ्या चांगल्या दिवसांची प्रतीक्षा करत आहे. कारण, तेव्हा मला जे आवडते त्या गोष्टी करायला मिळतील. ती गोष्ट आहे काम. मला माझं काम खूप आवडतं. जेव्हा मी काम करते, तेव्हा मी माझ्या स्वप्नांसाठी जगते. हिचं माझी सर्वात मोठी प्रेरणा असते. मला काम करत राहायचं आहे. अनेक लोक विना कोणत्याही समस्येविना रोज नोकरी करतात आणि मी कुणी वेगळी नाहीये. मी देखील या महिन्यांमध्ये काही लोकांना भेटले आणि विश्वास करा की, त्यांनी माझा दृष्टिकोणच बदलला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT