मनोरंजन

हे तर काहीच नाय : मोने असो वा नार्वेकर, संजय म्हटलं की रंगले मजेदार किस्से

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

हे तर काहीच नाय या कार्यक्रमातून कलाकार मजेदार किस्से सांगून प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करतात. त्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता आहे. काही कलाकार हे स्वतःच इतके मिश्किल स्वभावाचे असतात की त्यांच्यासोबत घडलेले किस्सेदेखील तितकेच धमाल असतात. त्यात आवर्जून उल्लेख करावा असे कलाकार म्हणजे संजय मोने आणि संजय नार्वेकर. हे तर काहीच नाय कार्यक्रमात तुम्हाला धमाल आणि मजेशीर किस्से ऐकायला मिळणार आहेत.

येत्या आठवड्यात हे तर काहीच नायच्या मंचावर संजय मोने स्वतः प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहेत. पण त्यांचे किस्से हे न संपणारे आहेत. त्यामुळे उपस्थित कलाकारांपैकी गिरीश ओक यांनी देखील संजय मोने यांचे किस्से सांगून सगळ्यांना हसवून लोटपोट केलं. गिरीश ओक आणि संजय मोने हे एकदा बांद्रा वरून माहीमला जात होते तेव्हा पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली. त्यावेळी पोलीस आणि मोने यांच्यातील विनोदी संभाषण गिरीश ओक यांनी सांगितलं.

गिरीश ओक यांच्या नावावर संजय मोने पुण्यातील एक किस्सा नेहमी सगळ्यांना सांगतात, तो किस्सा नेमका कुठला? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. तर अतुल परचुरे यांनी संजय नार्वेकर यांच्यासोबतचे किस्से सांगितले. अतुल परचुरे आणि संजय नार्वेकर एकदा बाईकवरून जात असताना बाईक चालवत असलेल्या अतुलचे डोळे भर ट्रॅफिकमध्ये बंद केले आणि त्यांना बाईक चालवायला सांगितली. पुढे काय झालं? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका या कार्यक्रमाचा आगामी भाग शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

गिरीश ओक, अतुल परचुरे, संजय मोने यांच्या सोबतच आगामी भागात अदिती सारंगधर, मनसे नेते संदीप देशपांडे आणि मेघा घाडगे हे कलाकार देखील या मंचावर सज्ज होणार आहेत. त्यामुळे या भागातील सर्व धमाल, मजा मस्ती अनुभवण्यासाठी आगामी भाग चुकवू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT