पुढारी ऑनलाईन डेस्क
अगदी कमी वयात बॉलिवूड इंडस्ट्रीत आपले बस्तान बसवणारी आलिया भट्टची (HBD Alia Bhatt) चर्चा मात्र कायम आहे. तिचा नुकताच रिलीज झालेला गंगूबाई काठियावाडीतून आलियाने प्रेक्षकांकडून वाहव्वा मिळवलीय. इतकचं नाही तर ती या ना त्या कारणाने चर्चेत असते. रणबीर कपूर सोबतचं अफेअर असेल किंवा मुलाखती! अशीच एक तिची (HBD Alia Bhatt) मुलाखत गाजली होती. यामध्ये तिने आपले बेडरूम सीक्रेट्सविषयी खुलासे केले होते. लोकांना आपल्या सेक्स लाईफ विषयी बोलणे फारसं आवडत नाही. पण, आलिया भट्ट या मुद्द्यावर बिनधास्त आहे. एका फॅशन मासिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी तिने 'बेडरूम सीक्रेट्स' शेअर केले हाेते. आज १५ मार्च रोजी तिचा वाढदिवस. त्या औचित्याने तिच्याविषयी जाणून घेऊया.
alia bhattआलियाला विचारण्यात आले होते की, तिची फेव्हरेट सेक्स पोजिशन कोणती आहे यावर आलिया म्हणाली, "The classic missionary". आलियाला दुसरा प्रश्न विचारण्यात आला की, ती आपल्या बॉयफ्रेंडचा फोन चेक करते? तेव्हा आलिया म्हणाली, मला माझ्या बॉयफ्रेंडचा पासवर्ड माहिती आहे.
आलियाने मुलाखतीत पुरुषांना आपला सल्लादेखील दिला. आलिया म्हणाली, पृथ्वीवर जर ५० वर्षांचा पुरुष आणि १८ वर्षांचा टीन एजर असेल तर मी ५० वर्षांच्या व्यक्तीला निवडेन. कारण तिला टीनएजरसोबत राहायचं नाही. आलियाने आपल्या मुलाखतीत अन्य मुद्द्यांवरही चर्चा केली.
१० वर्षांच्या अभिनय करिअरमध्ये आलियाने जवळपास १५ चित्रपट केले. यापैकी १० चित्रपट हिट, २ फ्लॉप ठरले. ८ चित्रपटांनी १०० कोटी आणि २ चित्रपटांनी २०० कोटींहून अधिक कलेक्शन केलं आहे. आलियाने १९९९ मध्ये चित्रपट संघर्षमध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. तिने वयाच्या १८ व्या वर्षी चित्रपट स्टुडेंट ऑफ द ईयरमधून २०१२ मध्ये बॉलिवूड डेब्यू केले. हायवे, डिअर जिंदगी, राझी, गंगूबाई काठियावाडी यासारखे चित्रपट देऊन आलिया सर्वात अधिक हिट फीमेल सेंट्रिक चित्रपट देणारी अभिनेत्री झाली आहे.
आलियाच्या डेब्यूचे श्रेय करण जौहरला दिलं जातं. तो करणचं होता, ज्य़ाने आलियाला एका पार्टीत पाहिल्यानंतर तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. ५०० मुलींचे ऑडिशन घेतल्यानंतर आलियाला या चित्रपटात कास्ट करण्यात आलं होतं. या चित्रपटासाठी आलियाने १६ किलो वजन घटवलं होतं.
स्टूडेंट ऑफ द ईयर, हाईवे, 2 स्टेट्स, हंप्टी शर्मा की दुल्हनिया, कपूर एंड संस, उड़ता पंजाब, डियर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, राजी, गली बॉय यासारखे चित्रपट आलियाच्या नावावर आहेत.
हेही वाचलं का?