हॅरी पॉटरच्या जादुई विश्वात पुन्हा एकदा रमण्यासाठी जगभरातील चाहते सज्ज झाले आहेत. नुकताच 'हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन' (Harry Potter and the Philosopher's Stone) या पहिल्या सीझनचा टीझर ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजमध्ये जुन्या चित्रपटांऐवजी आता पूर्णपणे नवीन चेहरे पाहायला मिळणार असून, डोमिनिक मॅकलॉफ्लिन हा हॅरी पॉटरच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सीरिज ख्रिसमस २०२६ मध्ये 'HBO Max' वर प्रदर्शित होणार असून, पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचा सखोल अभ्यास यात पाहायला मिळेल, असा दावा निर्मात्यांनी केला आहे.
Harry Potter and the Philosopher's Stone Teaser
गेल्या अनेक दशकांपासून जगभरातील मुलांच्या आणि मोठ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'हॅरी पॉटर' या नावाची जादू पुन्हा एकदा पडद्यावर परतणार आहे. जे. के. रोलिंग यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीवर आधारित 'हॅरी पॉटर' टीव्ही सीरिजचा पहिला अधिकृत टीझर ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही सीरिज चित्रपटांपेक्षा अधिक सविस्तर आणि पुस्तकाच्या जवळ जाणारी असेल, असे संकेत या ट्रेलरमधून मिळत आहेत.
एचबीओ मॅक्सने आपल्या बहुप्रतीक्षित हॅरी पॉटर टीव्ही सीरीजचा टीझर जारी केला आहे. मार्क मायलॉड दिग्दर्शित या सीरीजमध्ये नवी कास्ट आहे, ज्यामध्ये डोमिनिक मॅकलॉघिलन हॅरी पॉटरच्या भूमिकेत दिसेल. एचबीओ मॅक्स (HBO Max) ने आपल्या प्रोजेक्ट्सपैकी एक हॅरी पॉटर टीव्ही सीरीजचा टीझर लॉन्च केला आहे. मार्क मायलॉडद्वारा दिग्दर्शित या सीरीजमध्ये नवी कास्ट असून नवं विश्व पडद्यावर परत आणेल.
या सीरीजची अशी असेल कास्ट
हॅरी पॉटरच्या फॅन्सना उत्सुकता आहे की, नव्या व्हर्जनमध्ये तिच कहाणी कशाप्रकारे पुन्हा सादर केली जाईल. निर्मात्यांनी खूप आधी ही गोष्ट कन्फर्म केली होती की, हरमाइनी ग्रेंजरची भूमिका अरेबेला स्टँटन, अल्बस डंबलडोरच्या भूमिकेत जॉन लिथगो असेल. हा शो एचबीओ मॅक्सवर रिलीज होईल. निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे की, ही सीरीज ख्रिसमस २०२६ ला रिलीज होईल. पण अद्याप तारीख सांगण्यात आलेली नाही. या सीरीजचे ऑफिशियल टायटल ‘हॅरी पॉटर एंड द फिलॉसफर्स स्टोन’ असेल.
काय असेल सीरीजची कहाणी?
सीरीजच्या ट्रेलरमध्ये यंग हॅरी आणि त्याचा मित्र हरमाइनी ग्रेंजर आणि रॉन वीज्लीला हॉगवर्ट्समध्ये आपल्या पहिल्या वर्षात दाखवण्यात आलं आहे. हॅरीची भूमिका डोमिनिक मॅकलॉघिलनने साकारलीय. ट्रेलरच्या सुरुवातीला एक महिला त्याला म्हणताना दिसते की, तुझ्यामध्ये काही स्पेशल नाही आहे. हॅरीला आपल्या आई-वडिलांबद्दल जाणून घ्यायचं असतं. तो हॅगरिटला विचारतो. हॅगरिट सांगतो की, तुझे पालक खूप समजूतदार होते.
हॅरी पॉटर सीरीज विषयी-
हॅरी पॉटर सीरीज जेके रॉलिंगच्या पुस्तकांवर आधारित आहे. या सीझनचा प्रत्येक एपिसोड त्या पुस्तकाशी प्रेरित आहे.