Hardik Pandya-Jasmin Walia breakup news
मुंबई - क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि ब्रिटिश गायिका जस्मिन वालियाचे एक वर्षानंतर ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. दोघांच्या लिंकअपची बातमी समोर आली होती. दोघेही एकमेकांना १ वर्षांपासून ओळखतात.
हार्दिक - ब्रिटिश सिंगर जस्मिन वालिया रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं. आयपीएल वेळीही जस्मिन अनेक वेळा हार्दिकला सपोर्ट करताना दिसली होती. मुंबई इंडियन्सच्या बसमध्येही पाहण्यात आलं होतं. दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती तोपर्यंत ब्रेकअपचे वृत्त समोर आले आहे. पण अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. रिपोर्टनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे.
एका रेडिटने त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची माहिती देत लिहिलं की, “हार्दिक - जस्मिन वालियाने एकमेकांना अनफॉलो केलं आहे.? काय सुरु आहे?” यानंतर ब्रेकअपचे वृत्त पसरले.
हार्दिकचा अभिनेत्री नताशा सोबत घटस्फोट झाल्यानंतर जस्मिन वालियाशी नाव जोडलं गेलं होतं. तेव्हा दोघांचे नाते पक्के झाल्याचे महटले जात होते. हार्दिक-जस्मिनने एकाच ठिकाणचे ग्रीस ट्रिप फोटोज शेअर केले होते. शिवाय दुबईमध्ये इंडिया-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मॅचमध्येही तिने हार्दिकला चिअर केले होते.
हार्दिक पंड्या -नताशाचे नाते संपुष्टात आल्यानंतर दोघे आपला मुलगा अगस्त्याचा सांभाळ मिळून करताहेत. दोघांनी एक स्टेटमेंट जारी करून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती.